Download App

Maratha Reservation चा हिरो झळकणार पडद्यावर; जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लाँच…

  • Written By: Last Updated:

Maratha Reservation : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर आता सरकारकडून त्यांच्या आंदोलनवरआणि मराठा आरक्षणासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

..म्हणून सरकार मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळणार; राऊतांचा खळबळजनक आरोप

त्यात आता मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले आणि पहिल्यापासून त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या या नायकाच्या आयुष्यावर आता सिनेमा देखील येणार आहे. त्यासाठी चित्रपट निर्माात्यांनी थेट जालना गाठलं. त्यानंतर जरांगेंच्या उपोषणस्थळावरूनच या चित्रपटाच्या टीमने जरांगेंच्या हस्ते या चित्रपटाचं पोस्टर देखील लॉन्च केलं आहे.

जरांगेंच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लॉन्च!

या अगोदर या चित्रपटाच्या टीमने जालन्यात येऊनच चित्रपटाची घोषणा कली होती. त्यानंतर आता याच जरांगेंच्या उपोषणस्थळावरूनच या चित्रपटाच्या टीमने जरांगेंच्या हस्ते या चित्रपटाचं पोस्टर देखील लॉन्च केलं आहे. ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”

यावेळी चित्रपटाच्या टीमने आणि उपस्थितांनी ‘संघर्ष योद्धा जरांगे पाटील’ असं लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. त्यानंतर जरांगे यांच्या हस्ते चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी स्वतः मनोज जरांगे म्हणाले की, हा माझा चित्रपट नाही. तर मराठ्यांचा संघर्ष आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोहन पाटील हा जरांगे यांची भूमिका साकारणार आहे. त्याने सांगितले की, मला जरांगे यांची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद झाला आहे. तर लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार असल्याची माहिती यावेळी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने दिली.

follow us