अभिनेता भरत जाधवने का सोडले मुंबई शहर; जाणून घ्या कारण

Bharat Jadhav :  मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे भरत जाधव होय. भरत जाधवने आतापर्यंत आपल्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. त्यानी आजपर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटक, टीव्ही सिरीयल या माध्यमातून काम केले आहे, आतापर्यंत नेहमीच त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे. भरत जाधवने ‘खबरदार’, ‘जत्रा’, अशा अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T183151.159

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 05T183151.159

Bharat Jadhav :  मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे भरत जाधव होय. भरत जाधवने आतापर्यंत आपल्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. त्यानी आजपर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटक, टीव्ही सिरीयल या माध्यमातून काम केले आहे, आतापर्यंत नेहमीच त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे.

भरत जाधवने ‘खबरदार’, ‘जत्रा’, अशा अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठी प्रेक्षकांचा आवडता अभिनेता म्हणून भरत जाधवकडे पाहिले जाते. पण सध्या भरत जाधव वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. भरत जाधवने मुंबई शहराला रामराम केला असून तो आता कोल्हापूर येथे स्थायिक जागा आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत त्याने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या  मुलाखतीत सांगितले आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

त्यामध्ये तो म्हणतो की मुंबई शहर हे आता बिजनेस हब झाले आहे. मला तिथे जुळवून घेणे कठीण वाटत आहे. या वेगाशी जुळवून घेण्यासाठी माझे वय सरत चालले आहे. परंतु आपल्याजवळ पैसे हवेत आणि आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवे म्हणून मी मुंबई बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे तो म्हणाला आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

तसेच मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि तिथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमवतो असे मला वाटू लागले आहे, असे तो आपल्या मुलाखतीत म्हटला आहे. त्यामुळे या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले आहे. आम्ही तिथे राहावे अशी माझी आईची इच्छा होती, असे भरतने सांगतले आहे.

Exit mobile version