Download App

Bharat Jadhav: भरत जाधवचे मोठ्या पडद्यावर कमबॅक; रवींद्रनाथ टागोरांच्या नाटकावर आधारित येणार सिनेमा

Bharat Jadhav Upcoming Movie: हा सिनेमा येत्या २७ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. (Social media) मराठी मनोरंजनसृष्टीमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav). नाटक असो किंवा सिनेमा भरत जाधवने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. (Entertainment) परंतु गेल्या काही दिवसांपासून भरत जाधव मोठ्या पडद्यापासून थोडासा लांब झाला आहे.


परंतु आता लवकरच रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकावर आधारित येणाऱ्या सिनेमातून भरत जाधव पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. आता चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. लंडन मिसळ’ या सिनेमात आदिती आणि रवी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची रंजक कथा बघायला मिळणार आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावे लागते त्याची रंजक कथा म्हणजे लंडन मिसळ. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, आणि कायम खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे.भारत जाधवच्या आगामी सिनेमाचे देशात तसेच लंडनमध्ये शूट झाले आहे. या सिनेमाचे नाव ‘लंडन मिसळ’ असे असणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी भरत जाधव पुन्हा एकदा एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करत असल्याचे दिसणार आहेत. आपल्या भूमिकेमधून चाहत्यांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधवने पहिल्यांदा सिनेमासाठी रॅप गायन केले आहे.

KBC 15 शोमध्ये पंजाबचा जसकरण जिंकू शकला नाही ७ कोटी; या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून हा सिनेमा प्रेरित करण्यात आला आहे. ‘लंडन मिसळ’ सिनेमात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत, तर भरत जाधव एका हटके भूमिकेमध्ये चाहत्यांचं निखळ मनोरंजन करत असताना दिसणार आहेत, आणि ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.

Tags

follow us