Download App

Hemant Dhome: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे फोटो शेअर करत हेमंत ढोमे संतप्त; म्हणाला…

Hemant Dhome Post: मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) कायम चर्चेत असतो. हेमंत कलाविश्वात अॅक्टिव्ह सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं असतो. आगामी प्रोजेक्टविषयी हेमंत सोशल मीडियाद्वारे (social media) चाहत्यांना माहिती देत असताना पाहायला मिळत असतो. अनेकदा तो फोटो देखील शेअर करत असताना दिसतो.

नुकतचं हेमंतने मुंबई- गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa highway) दुरावस्थेवर एक ट्वीट केले आहे. हेमंतच हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे. हेमंतने मुंबई- गोवा महामार्गावर रस्त्यांवरील खड्ड्याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत हेमंतने सांगितले आहे की, “चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे पहिले काही फोटो!

आता आपल्या रागाचं रूपांतर स्वतःचीच थट्टा करण्यात होत चाललं आहे!! भीषण!”. हेमंतने या खड्ड्यांची तुलना चंद्रावरील खड्ड्यांशी केली आहे. हेमंतने ही पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

OMG 2 Gadar 2 Release : ‘ओएमजी 2’ च्या पोस्टरवर दूध, सनीच्या ‘मैं निकला गड्डी लेके…’ वर डान्स; प्रेक्षकांचा धुमाकूळ

हेमंत ढोमेच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाले तर त्याचा ‘झिम्मा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करण्यात आली होती. आता नुकताच त्याचा ‘डेट भेट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता संतोष जुवेकर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच त्याचा क्षणभर विश्रांती, ऑनलाईन बिनलाईन, पोस्टर गर्ल सारखे सिनेमाही चांगलेच गाजले होते. २०१२ साली हेमंतने अभिनेत्री क्षिती जोगसोबत लग्नगाठ बांधली. क्षितीसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकताच तिचा करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us