Download App

Hardik Joshi: राणादाचा नवा सिनेमा ‘क्लब 52 ‘या’ दिवशी करणार धमाल

Hardik Joshi: अभिनेता हार्दिक जोशीला (Hardik Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची चाहत्यांना एक अनोखी भेट मिळाली आहे. (Poster Out) हार्दिकची मुख्य भूमिका असलेल्या “क्लब 52 (Club 52) या सिनेमाचं टायटल पोस्टर गेल्या (Marathi Movie ) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आला होता.


आज हार्दिकच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी ‘क्लब 52’ या मराठी सिनेमातील पहिला लुक हा सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘क्लब 52’ या सिनेमाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या मराठीच्या पोस्टरवर रावडी- रफटफ हार्दिक दिसून येत आहे. मोठ्या सोफ्यासारख्या खुर्चीत बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहे.

हार्दिकचा धमाकेदार लुक असलेल्या या पोस्टरमुळे सिनेमाबद्दल नक्कीच उत्सुकता वाढवत आहे. मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाचे पहिले पोस्टर लाँच झाल्यानं हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हा सिनेमा येत्या १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राच्या ‘क्लब 52’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Boys 4 Trailer Out: बॉईज आर बॅक… ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित

महेश गायकवाड यांचे सहकार्य आणि मोलाचे मार्गदर्शन या सिनेमाला लाभले आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या ‘क्लब 52’ या सिनेमाचं नाव मॉडर्न आणि आकर्षक आहे. मात्र नावावरून सिनेमाच्या कथेचा काहीच अंदाज बांधता येत नाही. तसेच कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. या सिनेमाचा अभिनेता हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे.

Tags

follow us