Download App

Hemangi Kavi : ‘झिम्मा 2’च्या अभिनेत्रींसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट; म्हणाली, “आता हा खेळ…”

Hemangi Kavi Post On Jhimma 2: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार बोलबाला सुरू आहे. (Marathi Movie) या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. (Facebook Post) सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट चाहत्यांच्या जोरदार पसंतीस उतरली आहे. अनेक कलाकार मंडळींनी देखील पोस्ट शेअर करत ‘झिम्मा 2’ तोंडभरून कौतुक केलं आहे.


हेमांगी कवीची पोस्ट
मला तर बाई लय मंजी लय मज्जा आली!
हेमंत ढोमे…अरे काय कमाल सिनेमा आहे! Frankly speaking ‘झिम्मा 1’ पेक्षा ‘झिम्मा 2’ जास्त जमून आलाय. कदाचित या बायकंना आम्ही झिम्मा 1 पासून ओळखत होतो म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी पण तितकीच प्रभावी आणि relatable! विचार करायला लावणारी आणि आचरणात आणायला कुठेही कठीण न करता सहजपणे आपल्यात बदल करू शकणारी! खरंच मज्जा आली. प्रचंड enjoy केला मी हा सिनेमा!

निर्मिती सावंत!!!! काय करायचं या बाईचं! म्हणजे मला काही सुचेचना! कसं कसं करतेस गं तू! इतक्या वर्षांपासून कसं गं हे अबाधित ठेवलंयस? आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला lead किंवा Heroine म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून आपण लगेच categories करतो. Hollywood किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना Lead म्हणूनच पाहिलं जातं. Awards साठी main category मध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तू कारणीभूत असशील ताई. इतकं भारी काम केलंयस तू!

सुहास ताई, हीच गोष्ट ‘तू तिथं मी’ च्या वेळी वाटली होती. आणि आज ही तुमची इंदू पाहून वाटलं! तो line मारायचा scene! मी तर शिट्टीच हाणली theatre मध्ये. क्या बात है! दुसरं कौतुक करावंसं वाटतं ते रिंकू राजगुरुचं. खूप समजून- उमजून काम केलंय. Typical सून न करता एकदम छान तान्या साकारली आहे. Screen वर दिसताच आपसूक आमच्या चेहऱ्यावर smile येत होतं. थोडक्यात या सासू-सूनेने लयच धमाल आणलीए!

एक एक scene चोपलाय तिघींनी! जाता जाता एवढंच सांगेन हेमंत ढोमे आता आम्हांला झिम्मा ३ हवाय. हवाय म्हणजे हवायययययय! ते तू बाकी सिनेमे करत रहा पण झिम्मा universe ला अंत देऊ नकोस! फार फार तर काय होईल एखादा part फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती तुझ्या सगळ्या team कडे. इरावती कर्णिक, क्षितिज पटवर्धन कमाल कमाल! कमाल!

Kangana Ranaut: ‘महिलांना पुरुषांची गरज असते…’, कंगनाच्या लक्षवेधी पोस्टने वेधल्या अनेकांच्या नजरा

अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा नुकताच ‘झिम्मा 2’ सिनेमा बघितला आहे. हा मराठी सिनेमा बघितल्यावर अभिनेत्रीने फेसबुक पोस्टवर त्यातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सिनेमाचं कथानक, यामधील कलाकार, झिम्माच्या लेखिका याबद्दल सविस्तर वर्णन हेमांगीने या पोस्टमध्ये केलं आहे. तसेच आता आमच्यासाठी ‘झिम्मा 3’ बनव आणि ‘झिम्मा’ सिनेमाच्या मालिकेला अंत देऊ नकोस, अशी विनंती अभिनेत्रीने सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेकडे या पोस्टद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान सध्या ‘झिम्मा 2’ चे कलाकार सिनेमागृहांना भेट देऊन चाहत्यांचा उत्साह वाढवत आहेत. सिनेमाचा प्रत्येक शो हाऊसफुल्लं असल्याची कलाकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत बघायला मिळालं आहे. ‘झिम्मा 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करत आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. याअगोदर 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या झिम्माच्या पहिल्या भागाला सुद्धा चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज