Kushal Badrike: ‘माहितीये रे बाबा तुझं प्रेम आहे बायकोवर…’, कुशलच्या पोस्टवर भन्नाट कमेंट्स

Kushal Badrike: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आपल्या सगळ्यांचेच मनोरंजन (Entertainment) करत घराघरात पोहोचला आहे. कुशल हा जेवढा त्याच्या कामाच्या बाबतीत ऍक्टिव्ह असतो, तेवढाच तो सोशल मीडियावर (Social media) सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून तो चाहत्यांना त्याच्या जीवनातील प्रत्येक अपडेट देत असतो. […]

Kushal Badrike

Kushal Badrike

Kushal Badrike: ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आपल्या सगळ्यांचेच मनोरंजन (Entertainment) करत घराघरात पोहोचला आहे. कुशल हा जेवढा त्याच्या कामाच्या बाबतीत ऍक्टिव्ह असतो, तेवढाच तो सोशल मीडियावर (Social media) सुद्धा ऍक्टिव्ह असतो. त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वरून तो चाहत्यांना त्याच्या जीवनातील प्रत्येक अपडेट देत असतो.


कुशलने नुकतीच त्याच्या बायकोसाठी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कुशलचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास म्हणावा तितका सोपा नक्कीच नव्हता. पण आज कुशल ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्यामध्ये या प्रवासात त्याला त्याच्या बायकोची खंबीर साथ लाभली आहे. त्यासाठीच कुशलने आपल्या प्रिय पत्नीसाठी इंस्टाग्रामवर त्या दोघांचा फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटलं आहे की, ‘मै हर वक्त बस तुम्हे देखना चाहता हू’.

कुशलची पत्नी सुनयना ही एक उत्तम कथ्थक डांसर आहे. सध्या ती ‘मुघल-ए-आझम’ या म्युझिकल शोसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. त्यामुळे तिच्या आठवणीत कुशलने त्याच्या डिजिटल घड्याळाचा फोटो शेअर केला आहे. ज्या घड्याळात त्याच्या पत्नीचा फोटो त्याने वॉलपेपर म्हणून ठेवलेला आहे. सध्या कुशल ची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

कुशलच्या या पोस्टवर त्याच्या मित्रांच्या तसेच त्याच्या चाहत्यांच्या सुद्धा भन्नाट अशा कमेंट्स येत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर परिसरात ‘मुघल-ए-आझम’ च्या फ्लॅश मॉबमध्ये अभिनेत्याची पत्नी सुनयना सहभागी झाली होती. त्यावेळी सुद्धा अभिनेत्याने पत्नीला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.

Exit mobile version