Download App

Rajan Patil: मराठी अभिनेत्याच्या प्रश्नाने गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ!

Gautami patil: आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. गौतमीचा डान्सचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. (Social media) असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.


कारण देखील तसेच काहीसा आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते राजन पाटील (Actor Rajan Patil) यांनी गौतमी पाटीलबद्दल काही प्रश्न उपस्थित केल्याचे बघायला मिळत आहे.गौतमी पाटीलचे कार्यक्रम आणि तिथे होणारा गोंधळ, पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज याबद्दल राजन पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केल्याचे बघायला मिळत आहे.

काय आहेत प्रश्न…?

1. गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा होऊन पोलिसांचा लाठीमार का होतो ? यापूर्वी रसिकांना अनेक लावणी सम्राज्ञीनी वेड लावले होते. पण असा प्रकार क्वचितच झाला असेल. मग आत्ताच का ?
2. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाचे मूल्य काही लाखात असते ?
3. जर हे सत्य असेल तर ती या सर्व उत्पन्नावर आयकर भरते का ?
4. तिच्या उत्पन्नात कोणी सक्षम/सशक्त असामी वाटेकरी आहे का ?
5. जर असेल तर तो अदृश्य असामी कुठल्या विशिष्ठ पक्षाचा आहे का ? की ‘ तेलगी ‘ प्रकरणात होते म्हणे तसे सर्वपक्षीय सामील आहेत ?
6. काही दबंग वाहिन्या ती अत्यंत भोळी आहे, निरागस आहे, निष्पाप असून तिची हकनाक बदनामी केली जातेय अशी इमेज तयार करतायत का ?
7. ‘गौतमीच्या कार्यक्रमात राडा ‘ यात काही काहीतरी गूढ आहे असं तुम्हाला वाटतं का ?

सध्या अभिनेत्याने केलेल्या या पोस्टवर अनेकांचे कॉमेंट्स येत आहेत. नक्कीच चिंतनीय विषय आहे सर. हल्ली सरळमार्गी माणसाला कायदा पाळावा लागतो. बाकीचे बदमाश सर्व करून प्रतिष्ठेत जगतात.राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य होत नाही. मध्ये तिची मुलाखत ‘माझा कट्टा’ वर झाली होती.
पूर्ण पाहता नाही आली पण रडत होती.गरीब आहे म्हणून ट्रोल केलं जातंय म्हणत होती.सुंदर मुलगी रडते आहे तर सगळे विरघळणारच.पुढे काय म्हणाली कळलं नाही.

Anushka Sharma: विराट अन् अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?

तिचं एक रील पाहण्यात आलं (की आली?).त्यात जरा प्रखर हावभाव केल्यासारखं वाटत होतं.तेच आवडत असावं लोकांना.कुणास ठाऊक? मी तमाशा सिनेमातच पाहिलाय त्यामुळे नक्की काही कळत नाही. हिडीस हावभाव हे वॆशिष्ट्य..त्याने उद्दीपित होणारा वर्ग हे भांडवल..आणि नकारात्मक का होईना, प्रसिद्धि..थांबेल आपोआप..नव्याचे नऊ ..! सवंग प्रसिद्धीसाठी जाहीर वादग्रस्त परिस्तिथी जाणून बुजून निर्माण केली जाते व पैसा छापला जातो हे कलाक्षेत्रात नेहमीच घडते. लोकांनी मूर्ख बनू नये पण ते घडतं हे वास्तव आहे. त्याचाच फायदा हे लोक घेत असतात. सध्या अशी प्रतिक्रिया अभिनेत्याच्या पोस्टवर मिळत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us