Santosh Juvekar : सध्या मराठीमध्ये ऐतिहासिक सिनेमाची चलती आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ सारख्या ऐतिहासिक मराठी सिनेमानं चाहत्यांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत आहे. (Marathi Movie) छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभे करत असताना निधड्या छातीने लढणाऱ्या शिलेदारांची मोठी साथ लाभली आहे. इतिहासाच्या पानांमध्ये ‘रावरंभा’ (Raavrambha ) ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांमधील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे.
तसेच ‘रावरंभा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बघितल्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar ) हा सोशल मीडियावर (Social media) सतत सक्रीय असतो. नुकतंच संतोषने रावरंभा या सिनेमाबद्दल अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये त्याने अनेक चाहत्यांना हा सिनेमा बघावा, असे आवाहन केले आहे. त्याबरोबरच संतोषने अभिनेता कुशल बद्रिकेची पोस्ट देखील शेअर केली आहे. मात्र यामुळे संतोष जुवेकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
“स्पायडरमॅन कळायला हवा, पण घोरपडीच्या सहाय्याने गड चढणारा “तानाजी मालुसरे” आधी कळायला हवा”, अशा आशयाची पोस्ट कुशलने केली होती. त्याची हिच पोस्ट संतोष जुवेकरने शेअर केली. त्यावर एका चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तुमचे पिच्चरं आली कि शिवराय आठवत्यात तुम्हाला, पैसे कमावता फक्त, महाराज त्यांचे मावळे तुम्हाला तरी कळलेत का अजून. ते स्पायडरमॅन, हल्क, आर्यन मॅन, मुलांना का कळायला हवीत. वाक्य तयार करण्यासाठी काहीही बाकळत जावू नका….” अशी कमेंट त्याने केली आहे.
त्यावर संतोष जुवेकरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मित्रा शिवराय अजून कुणालाच कळले नाहीत आणि कळणार देखील नाहीत, कारण माझा राजा स्वराज्यासाठी लढवह्या आहे आणि खरा स्वराज्यकरणी (राजकारणी नव्हे) आहे. पुन्हां असा न होणे राजा, पुन्हां असा न होणे लढवय्या, पुन्हां अशी न होणे काळजाला कळ स्वराज्या परी शिवराया सारखी. पुन्हां अशी न होणे माता शिवरायाची जिजाऊ सारखी. त्यानं दिलंय की ओंजळीत आपल्या. मग घेऊया आणि भाळी माळूया हा भंडारा. जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी”, अशी पोस्ट संतोष जुवेकर यांनी केली आहे.
‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान
त्याबरोबरच संतोष जुवेकरने फेसबुकवर या पोस्टचा स्क्रीनशॉट पोस्ट करत त्यात त्याने माफी देखील मागितली आहे. मला माझ्या एका मित्राने खूप खडसावले आहे, त्याबरोबरच असेल पण काहीस उगाच निरर्थक वाटलं म्हणुन हे माझं उत्तर त्याला दिले असल्याचे यावेळी याने सांगितले आहे. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. इतिहास आपण वाचलाय आणि ऐकलाय पण आपल्यापैकी बघितला कुणीची नाही. फक्त मनात आणि डोक्यामध्ये आणि विचारात व शरीरात आणि जे काय असल तिकडं आणि तिथे फक्त माझा शिवराय, अशी पोस्ट संतोष जुवेकरने यांनी केली आहे.
दरम्यान ‘रावरंभा’ या सिनेमात अभिनेता ओम भूतकर आणि अभिनेत्री मोनालिसा बागल हे मुख्य भूमिकेमध्ये झळकत आहेत. तर अभिनेता अशोक समर्थ हे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसून येणार आहे. संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, किरण माने इत्यादी कलाकार देखील या सिनेमात बघायला मिळणार आहे.