Download App

Jawan: ‘या’ लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याने पायऱ्यांवर बसून बघितला किंग खानचा सिनेमा; यावर नेटकरी म्हणाले…

Jawan: बॉलीवूडच्या किंग खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ सिनेमाने जोरदार कमाईला सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. (Jawan) पहिल्याच दिवशी ‘जवान’ने मोठा इतिहास रचला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच यूएसएमध्ये या सिनेमाची ३३ हजार तिकिटे विकली आहेत. (Box Office Collection) या आठवड्यामध्ये ‘जवान’ ४०० कोटींचा गल्ला कमवण्याची शक्यता आहे. असा हा सुपरहिट सिनेमा एक मराठमोळा अभिनेत्याने चक्क पायऱ्यांवर बसून बघितला आहे. याचा फोटो (Social media) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

किंग खानचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांबरोबरच कलाकार मंडळी देखील आहेत. अनेक कलाकार मंडळी किंग खानचे चाहते आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याचा शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट पाहतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये हा अभिनेता पायऱ्यांवर बसून ‘जवान’ पाहता असल्याचे बघायला मिळत आहे.


हा मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून शरद केळकर (Sharad Kelkar) आहे. शरद केळकर हा मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने किंग खानचा ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी जाऊन बघितला आहे. शरदने चक्क सिनेमागृहातील पायऱ्यांवर बसलेला फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “पायऱ्यांवर बसून का होईन पण आज ‘जवान’ पाहायचाच होता.”, अशी पोस्ट त्याने यावेळी केला आहे.

Madhuri Dixit: बिग बींच्या ‘या’ सिनेमाच्या सीनसाठी दिग्दर्शकानं माधुरीला ब्लाऊज काढायला सांगितला अन्…

परंतु शरद केळकरची ही पोस्ट काही नेटकऱ्यांना चांगलीच खटकल्याचे बघायला मिळत आहे. एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “मी पण असाच बसलो होतो पण सिनेमा दुसरा होता ‘सुभेदार’” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “एवढं प्रेम ‘सुभेदार’ सिनेमाला दिलं असतं तर बरं झालं असतं.” तर तिसऱ्याने लिहीलं आहे की, “आता फक्त एकच ध्यास मराठी सिनेमा हाच आमचा श्वास.”

दरम्यान, ‘सुभेदार’ सिनेमाविषयी सांगायचं झालं तर, तिसऱ्या आठवड्यातमध्ये या मराठी सिनेमाची यशस्वी घौडदौड सुरू आहे. प्रदर्शित होताच पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने ८ कोटीहून जास्त गल्ला कमवला असल्याची माहिती आहे.

Tags

follow us