Siddharth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधवला चाहत्याने दिली आईवरुन शिवी, संतप्त होत म्हणाला …

Siddharth Jadhav : मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे ( Siddharth Jadhav ) बघितले जातं. फक्त मराठीत नव्हे तर सिद्धार्थने संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणून सिद्धार्थची ओळख निर्माण झाली आहे. तो सतत त्याच्या सिनेमामुळे चर्चेत येत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 29T110424.936

Siddharth Jadhav

Siddharth Jadhav : मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे ( Siddharth Jadhav ) बघितले जातं. फक्त मराठीत नव्हे तर सिद्धार्थने संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणून सिद्धार्थची ओळख निर्माण झाली आहे. तो सतत त्याच्या सिनेमामुळे चर्चेत येत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. त्यामुळे तो चांगलंच संतापल्याचे बघायला मिळाला आहे.

सिद्धार्थ जाधवला अनेकवेळा काहींना काही कारणांनी ट्रोल केले जात आहे. त्याला त्याच्या दिसण्यावरुन, कामावरुन अनेकवेळा लोक ट्रोल करत असतात. सततच्या या ट्रोलिंगकडे तो नेहमी दुर्लक्ष करत असतो. दिसण्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगला तो गांभीर्याने घेत नाही.


आता मात्र त्याने एका पोस्टच्या कमेंटवरुन चांगलंच संतापल्याचे दिसून आला आहे. सिद्धार्थ जाधव हा सध्या त्याच्या लेकींसोबत लंडन टूर करत असताना दिसून आला आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्याने एका कमेंटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. त्या कमेंटमध्ये एका चाहत्याने सिद्धार्थला आईवर शिवी दिली आहे.


“अरे बावळट बोर्डच्या सिद्ध कितीवर एक्टिंग करशील मा**** काल्या”, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. त्यावर सिद्धार्थने त्याला चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. “ट्रोलिंग मान्य आहे, पण शिवी देणं कितपत योग्य आहे? फक्त विचारत आहे”, अशी सिद्धार्थने यावेळी त्याला विचारले आहे.

राघव-परिणीती ‘या’ ठिकाणी अडकणार विवाह बंधनात; जोडपे वेंडिंग डेस्टिनेशल फायनल करण्यासाठी निघाले

दरम्यान सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’, बालभारती, सर्कस हे सिनेमा गेल्या काही दिवसापासून प्रदर्शित झाले आहेत. सध्या तो वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका दिसून येणार आहेत.

Exit mobile version