Sonali Kulkarni: दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलालसोबत मराठी कलाकार करणार काम

Sonali Kulkarni: महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) वैविध्यपूर्ण काम करताना दिसते. मनोरंजन विश्वात विविध गोष्टी ती करुन पाहते. मराठी, हिंदी चित्रपट, रिएलिटी शो अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिचं नृत्यकौशल्य आणि अभिनयातील वेगळेपण प्रेक्षकांना कायम आकर्षित करतं. सोशल मिडीया माध्यमातही ती सक्रिय असून चाहत्यांशी जोडली गेली आहे. यातच या वर्षी तिने चाहत्यांना […]

Sonali Kulkarni

Sonali Kulkarni

Sonali Kulkarni: महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni) वैविध्यपूर्ण काम करताना दिसते. मनोरंजन विश्वात विविध गोष्टी ती करुन पाहते. मराठी, हिंदी चित्रपट, रिएलिटी शो अशा विविध माध्यमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करते. तिचं नृत्यकौशल्य आणि अभिनयातील वेगळेपण प्रेक्षकांना कायम आकर्षित करतं. सोशल मिडीया माध्यमातही ती सक्रिय असून चाहत्यांशी जोडली गेली आहे.

यातच या वर्षी तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सोनाली कुलकर्णी ही मल्याळम चित्रपटात झळकणार असल्याचं तिने सांगितलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने तिची स्वप्नपूर्ती झालीय. कारण या मल्याळम चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका खास व्यक्तिसोबत काम केले आहे.


मलाइकोकटाई वालीबन असं या मल्याळम चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा पोस्टरही सोनालीने काही महिन्यांपूर्वी सोशल मिडीयावर शेयर केला होता. तर या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांच्यासोबत काम केलय. ‘नवीन वर्ष, नवीन प्रवास, नवीन जागा. माझं नवीन वर्ष नक्कीच खूप छान असणार आहे लोकप्रिय सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद.’ असं म्हणत तिनं या चित्रपटाती एक पोस्ट शेअर केली होती.

मात्र नुकतच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालय. या निमित्ताने शूटिंग पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी सुपरस्टार मोहनलाल देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबतचे काही फोटो सोनालीने सोशल मिडीयावर (Social media) शेयर केले आहेत. या सेलिब्रेशनचे खास क्षण सोनालीने सोशल मिडीयावर शेयेर केले आहेत. या फोटोत या चित्रपटाची टीम पाहायला मिळत आहे.

International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral

एवढच नाही तर या चित्रपटासाठी सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरनेही काम केलय. फुलवानेही मोहनलाल यांच्यासोबतचे फोटो शेयर केले आहेत. मोहनलाल हे मल्याळम चित्रपटाचे सुपरस्टार आहेत. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलय. या सुपरस्टार सोबत काम करण्याची संधी मिळण सोनाली कुलकर्णीसाठी स्वप्नपूर्ती आहे.

तेव्हा या मल्याळम चित्रपटातील सोनालीचं काम पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवाय मोहनलाल यांच्यासोबत सोनालीला काम करताना पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल एवढं नक्की.

Exit mobile version