अमृतसरमध्ये नवा ट्विस्ट! “उडने की आशा” मध्ये हिमांशी पराशरची सिम्मी उडवणार खळबळ

Udne Ki Asha : रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन रहाणारं चॅनल असणाऱ्या स्टार प्लसची सुप्रसिद्ध मालिका "उडने की आशा" मध्ये एक नवा ट्विस्ट

  • Written By: Published:
Udne Ki Asha

Udne Ki Asha : रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करुन रहाणारं चॅनल असणाऱ्या स्टार प्लसची सुप्रसिद्ध मालिका “उडने की आशा” मध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे.  मालिकेत हिमांशी पराशरची सिमरन म्हणून एंट्री होणार असून सिमरन उर्फ सिम्मी ची ही अनपेक्षित एन्ट्री कथानकात खळबळ उडवून देणार असल्याचं कळतंय. अमृतसर सारख्या शहरात मालिकेची कथा भावनिक वळण घेताना बघायला मिळणार आहे. कंवर ढिल्लन साकारणारा सचिन शहरात ड्रायव्हर म्हणून काम करताना दिसतोय दरम्यान नेहा हरसोरा साकारणारी सायलीही अमृतसरमध्ये पोहोचते पण पुढे काय घडणार आहे याची तिला अजून कल्पना नाही.

मात्र या सगळ्याच्या पाठीमागे एक खोल वेदना दडलेली असून सायलीने आपला विश्वासघात केला आहे, असा समज करून सचिन दुःख मनात घेऊन कामासाठी दूर निघून जातो. सामना करण्याऐवजी तो अंतर ठेवण्याचा निर्णय घेत अमृतसरला जातो आणि कामात स्वतःला गुंतवून वेदना विसरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या नकळत सायलीही त्याच्या मागोमाग अमृतसरला येते, गैरसमज दूर करून त्याचं तुटलेलं मन सांधण्यासाठी ठाम निर्धाराने त्याचा मागोमाग तिथे पोहचते. याच भावनिक प्रवासात सचिनची भेट सिमरन उर्फ सिम्मीशी होते जी भूमिका हिमांशी पराशर साकारत आहे.

आपल्या सिमरन या पात्राबद्दल बोलताना हिमांशी पराशर म्हणाली “मला ‘उडने की आशा’मध्ये ही खास भूमिका ऑफर झाली तेव्हा मी सहसा कॅमिओ करत नाही पण हे पात्र पंजाबी असून खूप रंगतदार आणि  कमालीचं सुंदर आहे त्यामुळे मी ही संधी सोडू शकले नाही. स्टार प्लस माझ्यासाठी घरासारखं आहे त्यामुळे नकार देणं शक्यच नव्हतं. मी सिमरन उर्फ सिम्मीची भूमिका साकारतेय. सचिनच्या कारसमोर माझी एन्ट्री हा माझा पहिलाच सीन होता आणि तो खूपच खास ठरला कारण सेटवर आम्ही एक छोटासा प्रँकही केला होता म्हणून हा अनुभव खूप छान होता”

ती पुढे म्हणते “सिमरन या कथेत अनपेक्षित ट्विस्ट आणणार असून ‘उडने की आशा’बद्दल मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ती हलकी-फुलकी असूनही वास्तववादी आहे. आम्ही आगामी ट्रॅकचे शूटिंग खूप एन्जॉय करत आहोत आणि प्रेक्षकांनाही तो तितकाच आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद”

‘या’ दिवशी ZEE5 वर “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सचिनची निष्ठा आता कसोटीवर लागणार का? सायली त्याच्यापर्यंत पोहोचून गैरसमज दूर करू शकेल का? की सिमरनची रंगतदार एंट्री त्यांच्या नात्याचे समीकरण कायमचे बदलून टाकेल? अमृतसरमध्ये उलगडणाऱ्या या कथानकात नात्यांची परीक्षा होणार असून नियतीही नवे वळण घेऊ शकते. एक गोष्ट नक्की ‘उडने की आशा’चा हा नवीन अध्याय प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरणार असून थरारक क्षण घेऊन येणार आहे यात शंका नाही. ‘उडने की आशा’ रोज रात्री 9 वाजता बघायला विसरू नका फक्त स्टार प्लसवर !

follow us