Download App

अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! शेअर केले जोडीदारासोबतचे खास फोटोज

Pooja Sawant Engaged : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे या लोकप्रिय जोडीनंतर (social media ) आता लवकरच ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) लवकरच बोहल्यावर चढणार आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो (Romantic Photo) शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.


अभिनेत्री पूजा सावंतने 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या मराठी सिनेमातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर कमी काळातच पूजाने तिच्या अभिनयाची अनोखी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली. ‘दगडी चाळ’ सिनेमामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता अभिनेत्रीने आयुष्यातील एक नवा प्रवास लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची रिंग बघायला मिळत आहे.

पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा होणारा नवरा पाठ करून उभा आहे, आणि अभिनेत्री त्याला मिठी मारत असल्याचे बघायला मिळत आहे. पूजाने या पोस्टमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केले नाही, आणि एकाही फोटोमध्ये अभिनेत्रीने त्याचा संपूर्ण चेहरा दाखवला नाही. यामुळे हा मुलगा नेमका कोण आहे? असा सवाल सध्या तिचे चाहते करत आहेत.

Kiran Mane: किरण मानेंची अभिनेत्रीबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “इतर कलाकारांपेक्षा सोनालीने…”

पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अद्याप समोर आले नाही. मात्र, तो कोणताही अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि लवकरच हे दोघेही बोहल्यावर चढणार आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पूजाची सख्खी बहीण रुचिरा सावंतने देखील लाडक्या ताईसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा देत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us