Kedar Shinde Post: ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “कुठेतरी थांबायला… ”
Kedar Shinde Instagram Post: केदार शिंदे (Kedar Shinde Post) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले आहे. ६ अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम दिल आहे. ३० जून २०२३ दिवशी ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. अवघ्या काही दिवसांमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एक अनोखा रेकॉर्डब्रेक (Record break) केल्याचे बघायला मिळाले.
सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने-कुलकर्णी, दीपा परब-चौधरी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर यांनी मुख्य भूमिका साकारले आहे. या ६ अभिनेत्रींच्या अभिनयासोबतच सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचं चाहत्यांकडून मिळालेलं कौतुकाची थाप खूप मजबूत आहे. ‘बाईपण भारी देवा’च्या या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी एका आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या केदार शिंदे यांची इन्स्टाग्राम पोस्ट जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केदार शिंदे लिहितात, “एक लांबलचक सुट्टी घेतोय या इन्स्टाग्रामवरून…तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण, खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं, नव्या विचारांसाठी… बाय फॉर नाऊ!” अर्थातच मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या या लोकप्रिय दिग्दर्शकाने इन्स्टाग्रामवरून ब्रेक घेणार असल्याचे दिसत आहे. आगामी प्रोजेक्ट्स आणि नव्या सिनेमाचं काम यासाठी केदार शिंदेंनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Anti Heroes: शाहरुख खान ते राजकुमार राव रुपेरी पडद्यावर ठरले ‘पॉवर अँटी हिरोज’
तसेच ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होणार म्हणून केदार शिंदे इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले होते. मात्र मार्चच्या सुरुवातीला त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे बघायला मिळाले होते. यामुळे ते नवं अकाऊंट ओपन करून चाहत्यांच्या संपर्कात राहिले होते. तसेच याअगोदर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचं फेसबुक अकाऊंट देखील हॅक करण्यात आले होते.