Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…

Priya Bapat Post: मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. ती सध्या यशाच्या शिखरावर आहे. उत्तम अभिनयबरोबरचं प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही जोरदार चर्चेत असते. चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर (Social media) बरीच सक्रिय असते. अभिनेत्री प्रिया बापट सध्या ऑस्ट्रेलियाला तिच्या व्हॅकेशनचा आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियात तिच्यासोबत उमेश कामत देखील आहे. […]

Priya Bapat

Priya Bapat

Priya Bapat Post: मराठी सिनेमासृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. ती सध्या यशाच्या शिखरावर आहे. उत्तम अभिनयबरोबरचं प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही जोरदार चर्चेत असते. चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर (Social media) बरीच सक्रिय असते. अभिनेत्री प्रिया बापट सध्या ऑस्ट्रेलियाला तिच्या व्हॅकेशनचा आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहे.

ऑस्ट्रेलियात तिच्यासोबत उमेश कामत देखील आहे. दोघेही त्यांचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ऑस्ट्रेलिया ट्रीपमध्ये प्रिया बापट नवनवीन फोटो शेअर करत आहेत. प्रिया बापटने नुकतेच तिचे बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत. यामुळे प्रिया बापट जोरदार चर्चेत आला आहे.


प्रिया बापट पोस्ट
प्रिया बापटने ऑस्टेलियाच्या समुद्रकिनारी फोटो काढत सांगितले आहे की, प्रियाने ग्रीन अँड व्हाईट बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. प्रिया या फोटोमध्ये खूपच आनंदी दिसत आहे आणि तिचे सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच तिने फोटो शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अजून एक नवीन गोष्ट केली. माझ्या यादीतील आणखी गोष्ट पूर्ण झाली.’

यापोस्ट मधून तिला नेमके काय साध्य करायचे आहे? इस्रायलमधल्या बळी पडलेल्या निष्पाप महिलांना विचारा, की प्रत्येक इंचाचा अर्थ आणि महत्व काय असते ते. स्वतःच्या शरीराचा अभिमान असावा पण अतिरेक नको. शरीर सौष्ठव स्पर्धेत पण अंग दाखवतात…पण एखादा हायलाईट करणं..” असं म्हणत एका चाहत्याने तिला कमेंट केल्याचे बघायला मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=PCA55ahwZh8

तसेच “प्रियाताई तुझी एक अनोखी ओळख आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये तुला हे दाखवण्याची खरंच गरज नाहीय. मुक्ता बर्वेसारख्या मोठ्या कलाकारांसह तुझे नाव आदराने घेतले जाते. परंतु तू आत्ता सई ताम्हणकरच्या यादीत स्वतःला टाकत आहेस आणि हे तुझ्या साठी योग्य नाही… तू एक खूप सुंदर आणि सुशील कलाकार आहे. असे देखील  कमेंट करत प्रियाला ट्रोल केले आहे. प्रिया बापटच्या या पोस्टवर शेकडो कमेंट्स पडल्या आहेत.

Sam Bahadur Teaser: सॅम बहादुर सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज

गेल्या काही दिवसाखाली प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या मुख्य भूमिका आहेत. १० वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे. या नाटकावर सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला होता.

Exit mobile version