Sai Ranade: मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार नेहमीच जोरदार चर्चेत येत असताना दिसून येतात. मराठी आणि हिंदी सिरियलमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई रानडेला (Sai Ranade) चांगलेच ओळखले जाते. ‘वहिनीसाहेब’ आणि ‘देवयानी’ या सिरियलमुळे (Devayani Serial ) ती चाहत्यांच्या मनात चांगलीच जागा केल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु नुकतंच सईने एका लोकप्रिय सिरियलमधील कलाकारांबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री भार्गवी चिरमुले, समिधा, मृणाल आणि सई रानडे या चौघी खास मैत्रिणी नेहमी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत असलयाचे पाहायला मिळतात. माहोल मुली असा एक ग्रुप त्यांनी सध्या सुरु केला आहे. यामध्ये त्या प्रमाण मराठी भाषेमधील काही शब्द वऱ्हाडी भाषेत कशापद्धतीने बोलले जात असतात किंवा त्या शब्दांना दुसरा पर्यायी वऱ्हाडी शब्द काय वापरायचे याबद्दल सांगत असताना नेहमी दिसून येत असतात.
कायम चर्चेत राहणाऱ्या या चौघींनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना त्या चौघींच्या मैत्रीविषयी विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यावेळी सईने भार्गवी चिरमुलेबद्दल सांगत असताना सिरीयलमध्ये तिला झालेल्या त्रासाबद्दल तिने यावेळी सांगितले आहे. “मी मनोरंजन क्षेत्रात जेव्हा एन्ट्री केले, त्यावेळेस माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझ्या सहकलाकारांनी माझं रॅगिंग केल्याचा धक्कादायक खुलासा तिने यावेळी केली आहे. यामध्ये भार्गवी चिरमुले नव्हती. परंतु मी यामुळे इतकी कंटाळले होते की मी मनोरंजनक्षेत्र सोडून पुण्याला परत जाण्याच्या विचारात होते. कारण या रॅगिंगमुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.
मी रॅगिंगचा चांगलंच धसका घेतल्याचा खुलासा तिने यावेळी केला आहे. यानंतर मी इथे फ्रेंडशिप करायला कधीच आले नाही. मी माझं काम करणार आणि तिथून निघून जणार, हे मी जोपासलं होत. माझे आठवणीतील मित्र-मैत्रिणी वेगळे, माझा नवरा आहे, कुटुंब आहे, त्यात मी खूप आनंदी होते. मी पहिल्यांदा जेव्हा पुढचं पाऊल सिरीयलच्या सेटवर गेले, तेव्हा तिथे अनेक वर्ष मनोरंजनसृष्टीत काम करणारे कलाकार होते. या सर्वांसमोर आपल्याला कसं काम करायला हवं. नाहीतर इथे देखील आपल्याला बरोबर रॅगिंग होऊ शकतं.
भार्गवी चिरमुलेसोबत मी पहिली सिरीयल केली. त्यामध्ये ती मुख्य अभिनेत्री होती आणि मी नकारात्मक पात्र करत होते. त्यावेळी मला माझे इतर जे सहकलाकार आहेत, त्यांनी मला खूप जास्त प्रमाणात त्रास दिला होता. त्यावेळी मी या सर्वांपासून थोडी लांब राहायला शिकले असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.
तसेच मला तेव्हा असं वाटायचं की, आपलं सर्व चुकले आहे. आपण माणूस म्हणून सुद्धा, अभिनेत्री म्हणून देखील चुकलं आहे. आपलं मुंबईमध्ये येण्याचं कारण मुळात चुकीचे ठरले आहे. यामुळे मी काम करुया, घरी जाऊया, काहीही संबंध नको असं ठरवलं होतं. परंतु त्यानंतर कालांतराने माझी आणि भार्गवीची मैत्री झाली”, असे सई रानडेने यावेळी सांगितले. दरम्यान लहानपणापासूनच सईला अभिनयामध्ये खूपच रस होता. ती सुरुवातीला मॉडेलिंग करत होती. वहिनीसाहेब ही सईची पहिलीच सिरीयल होती. या सीरियलमध्ये तिने जानकी किर्लोस्कर ही मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर ती कस्तुरी या सीरियलमध्ये देखील मुख्य भूमिकेत झळकली होती.