Download App

Adipurush: सिनेमात भाव खाऊन जातेय ही मराठमोळी अभिनेत्री, म्हणते “जे आयुष्यात कधी केलं नाही…”

प्रेरणा जंगम 

Adipurush: सध्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटासाठी समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. तर सोशल मिडीयावर (Social media) या चित्रपटाला ट्रोलही केलं जात आहे. रामायणापासून (Ramayana) प्रेरित या चित्रपटाच्या कथेत राघव, शेष, जानकी, रावण अशी पात्रांची नावे देण्यात आली आहे. अभिनेता प्रभास, क्रिनी सनॉन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त नागे या कलाकारांनी या चित्रपटात मुख्य पात्रे साकारली आहेत. यातच या चित्रपटातील आणखी एका भूमिकेने लक्ष वेधून घेतले आहे.

आदिपुरुष या चित्रपटात अनेक मराठीमोळे कलाकार पाहायला मिळतात. अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) बजरंगची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) ही कैकईच्या भूमिकेत झळकत आहे. याशिवाय आणखी एक मराठमोळी अभिनेत्री या चित्रपटातून सगळ्यांचच लक्ष वेधून घेत आहे. रामायणात आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे. रामायणानुसार या चित्रपटात रावणाची बहिण शूर्पणखा देखील दाखवण्यात आली आहे.

हे पात्र साकारले आहे, मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit). सिनेमागृहात या चित्रपटात तेजस्विनीची एन्ट्री पाहुन अनेकांना आनंद झाला आहे. शिवाय तिच्या कामाचही कौतुक केले आहे. याच भूमिकेविषयी तेजस्विनीने सोशल मिडीयावर एक पोस्टही देखील केली आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “जे आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं.. म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

मला आदिपुरुष चित्रपटात शूर्पणखेची भूमिका साकारताना बघा.” या पोस्टमध्ये तेजस्विनीने शूर्पणखेच्या भूमिकेतील पेहरावाचा फोटो पोस्ट केला आहे. या चित्रपटातील तिचा लूकही लक्ष वेधून घेणारा आहे. तेजस्विनीचे या चित्रपटात काही महत्त्वाचे सीन आहेत. या सीन्समधून तेजस्विनीचं काम भाव खाऊन जात आहे. अनेक हिंदी भाषिक प्रेक्षकांचही तेजस्विनीने लक्ष वेधून घेतले आहे. सिनेमागृहात तेजस्विनीच्या भूमिकेची मोठ्या पडद्यावर एन्ट्री होताच अनेकांना सुखत धक्का मिळाला आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

तेजस्विनीने आजवर विविध मराठी चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम केल आहे. तिच्या अभिनय कौशल्याने तिने आत्तापर्यंत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. निर्मिती क्षेत्रातही तिने पाऊल ठेवलं. तर मराठी वेब विश्वात ती वैविध्यपूर्ण काम करताना दिसत आहे. समांतर, अनुराधा, रानबाजार या वेब सिरीजमधून तिने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. आदिपुरुष चित्रपटातील तिच्या लक्षवेधी भूमिकेनंतर आगामी काळात ती आणखी बॉलीवुड चित्रपटांमध्ये झळकताना दिसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us