Download App

शर्वरीच्या गाण्यांनी ४०० मिलियन व्यूजचा टप्पा ओलांडला; २०२४ मध्ये झाली मोठ्या यशाची नोंद

शर्वरी म्हणते, 'गाणी कलाकारासाठी खूप महत्त्वाची असतात कारण ती प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

  • Written By: Last Updated:

Actress Sharvari Hit Song : बॉलिवूडमधील उभरती स्टार शर्वरीने २०२४ मध्ये मोठ्या यशाची नोंद केली आहे. तिचा १०० कोटींची ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुंजा’ आणि ग्लोबल स्ट्रीमिंग हिट ‘महाराज’ केवळ ( Sharvari ) प्रचंड लोकप्रिय ठरले नाहीत, तर तिचे सुपरहिट सॉन्ग्स ‘तरस’ (मुंजा), ‘हाँ के हाँ’ (महाराज) आणि ‘तैनू खबर नहीं’ (मुंजा) ने यूट्यूबवर ४०० मिलियन व्यूज ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

अ‍ॅक्टर म्हणून अ‍ॅक्शन करायचं माझं नेहमीचं स्वप्न होतं अल्फा मधून शर्वरीची स्वप्नपूर्ती!

शर्वरी म्हणते, ‘गाणी कलाकारासाठी खूप महत्त्वाची असतात कारण ती प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. मला अभिमान वाटतो की २०२४ मध्ये माझे तीन मोठे हिट गाणे झाले आणि विशेष म्हणजे ती सर्व गाणी वेगवेगळ्या शैलीची आहेत. ‘तरस’ एक दमदार डान्स नंबर आहे, ‘हाँ के हाँ’ जुन्या काळाचा रोमँटिक मोहकपणा दाखवते आणि ‘तैनू खबर नहीं’ आजच्या पिढीचं प्रेमगीत आहे.

ती पुढे सांगते, ‘२०२४ माझ्यासाठी विलक्षण वर्ष ठरले आहे. माझ्या चित्रपटांसोबतच गाण्यांनाही प्रचंड यश मिळाले आहे. मला जो प्रेम आणि सन्मान प्रेक्षकांकडून मिळाला आहे, तो खूप अनमोल आहे. मला आशा आहे की माझ्या आगामी प्रकल्पांमध्ये मी हा यशाचा सिलसिला कायम ठेवू शकेन. मी प्रेक्षकांचे आभार मानते की त्यांनी मला आणि माझ्या कामाला इतकं मान दिलं. आता मी त्यांना आणखी अभिमान वाटेल असं काही करायचा प्रयत्न करत आहे. शर्वरी पुढील चित्रपटात यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा आगामी मोठा चित्रपट ‘अल्फा’ मध्ये दिसणार आहे, ज्यात तिच्यासोबत बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट्टही असणार आहे.

follow us