Download App

Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”

Mrunal Divekar: मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडियावर (Social media) एक स्टार आहे. मृणालचे सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो फॉलोअर्स असल्याचे बघायला मिळत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या मृणालने (Mrunal Divekar) गेल्या काही दिवसाखाली एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान तिने लहान असताना तिच्यासोबत एकदा घडलेल्या वाईट प्रसंगाचा खुलासा यावेळी केली आहे. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने यावेळी केला आहे.


दिलेल्या मुलाखतीमध्ये मृणाल म्हणाली आहे की, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता, म्हणून मला अक्षरशः नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरी किंवा चौथीमध्ये होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन ते तीनवेळा होमवर्क केला नव्हता, म्हणून टिचरने असं केलं होतं. तसेच मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये तिच्या शाळेमधील अनुभव देखील सांगितला आहे. ती कराडच्या एका शाळेमध्ये अगोदर शिकत होती. मी अगोदर कराडच्या एका शाळेमध्ये शिकत होती, तिथून काही दिवसांनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीमधील फरक देखील कळला.

मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी निर्माण होत होत्या. ते मला खूप तुच्छतेची वागणूक देत असत. तसेच तेथील शिक्षक देखील मला मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमानस्पद वागणूक देत असत, असं तिने यावेळी सांगितलं आहे. पुढे ती म्हणाली की, तिथून मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. तिथे जी मुलं नाटक किंवा खेळामध्ये चांगली होती. त्यांचे एक वेगळे सेक्शन देखील बनवले होते. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे जमतं ते करा, परंतु त्यामध्ये तुम्ही खूप चांगलं कराल याची खात्री करा, असं सांगत असत,” असं ती म्हणाली होती.

Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो

कौशल्ये विकसित करण्यात दोन्ही ठिकाणी फरक होता. एखाद्या मुलाला लिहायला, वाचायला नाही येत. परंतु त्याच्यामध्ये दुसरे गुण काही तरी असतील तर त्यामध्ये त्याला एक्सप्लोर करायला लावणं, यामध्ये आपले शिक्षक आणि शिक्षण पद्धती कमी पडत आहे, असं मत मृणालने यावेळी मांडलं आहे. तसेच लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टी सतत मनावर आघात होत असतात. यामुळे तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करत आहे की नाही, लोक आपल्या कशा पद्धतीने जज करत आहे का? असे वेगवेगळे विचार मनात येत असतात. शिक्षकांना तेव्हा याचे परिणाम माहीत नसतात, परंतु मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहत असल्याचे मत मृणाल केली आहे.

Tags

follow us