Download App

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंसोबत काम करायचयं मग.. या ठिकाणी ऑडिशन द्या अन् सिनेमात चमका

  • Written By: Last Updated:

Nagraj Manjule Khashaba News: मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमधील सर्वात मोठ नाव म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj Manjule). सामान्य लोकांना तसेच आर्ची आणि परशा सारख्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर घेऊन येणारा आणि सर्वाना आपलासा करणारा नागराज मंजुळे यांची खासियत आहे.(Nagraj Manjule Khashaba News)  त्यांनी आतावर ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे धमाकेदार सिनेमा मराठी सिनेमासृष्टीला दिले आहेत.


सध्या नागराज मंजुळे हे भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची घोषणा केली आहे. आता या सिनेमात नवोदीत कलाकारांना काम करण्याची नवीन संधी मिळणार आहे. नागराज मंजुळे यांच्या सिनेमात काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न बनलं आहे. आता अनेक नवोदित कलाकारांना नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्याची चांगलीच सुवर्णसंधी मिळणार आहे.

नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर (Social media) याविषयी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी नवोदित कलाकारांना ऑडिशन देण्याचं आवाहन केले आहे. नागराज मंजुळेंनी नुकतंच एक धमाकेदार पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘खाशाबा’ सिनेमाच्या ऑडिशनविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी वयोमर्यादा, अटी आणि ऑडिशन कशी द्यायची, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

नागराज मंजुळेनी गेल्या काहीच दिवसापासून ‘खाशाबा’ या मराठी सिनेमाची मोठी घोषणा केली आहे. भारताचे दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर हा सिनेमा  असणार आहे. या सिनेमाची निर्मिती नागराज मंजुळे करत आहेत. त्याबरोबरच नागराज मंजुळे या सिनेमाचे दिग्दर्शनही करणार आहेत.

Tags

follow us