Download App

Ravi Jadhav: रवी जाधव यांची हेमांगी कवीसाठी खास पोस्ट; म्हणाले, ‘छोटेशी व्यक्तीरेखा…’

Ravi Jadhav: अभिनेत्री सुश्मिता सेनची (Sushmita Sen) बहुचर्चित ‘ताली’ (Taali) ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतंच मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

‘ताली’ या वेबसीरिजमध्ये हेमांगी कवीने सायली हे पात्र साकारलं आहे. यामध्ये तिने गौरी सावंत यांच्या बहिणीचे पात्र साकारत असल्याचे बघायला मिळाले आहे. रवी जाधव यांनी नुकतंच तिच्या पात्राची एक झलक दाखवली आहे. त्याला त्यांनी एक खास कॅप्शन देखील दिल्याचे बघायला मिळाले आहे.


हेमांगी कवी आमच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थीनी. तिने अभिनय केलेल्या ‘धुडगूस’ या सुंदर चित्रपटाची जाहिरात मी केली होती परंतु एकत्र काम पहिल्यांदाच ‘ताली’ मध्ये केले. छोटेशी व्यक्तीरेखा असुनही तीने ती ज्या ताकदीने साकारली आहे की जी प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील!!!

Dream Girl 2 ने केला मोठा धमाका; प्रदर्शित होण्याआधीच तब्बल इतक्या लाखांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

रवी जाधव यांच्या या पोस्टवर हेमांगी कवीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाली आहे की “खूप खूप धन्यवाद, सिनीअर” असे हेमांगी कवीने कमेंट करत सांगितल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान ‘ताली’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये सुष्मिता सेन ही मुख्य भूमिकेत साकारत आहे.

Tags

follow us