Dream Girl 2 ने केला मोठा धमाका; प्रदर्शित होण्याआधीच तब्बल इतक्या लाखांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Dream Girl 2 ने केला मोठा धमाका; प्रदर्शित होण्याआधीच तब्बल इतक्या लाखांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Dream Girl 2 Advance Booking : आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल’च्या यशानंतर आता चाहते ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) ची आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत आहे. आयुष्मान खुराना कायम हटके सिनेमा करत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ‘ड्रीम गर्ल-2’ या सिनेमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पूजाच्या भूमिकेमध्ये चाहते  मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाल्याचे दिसत आहे. आयुष्मान खुराना याचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा २५ आॅगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडे (Ananya Pandey) ही देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर हा सिनेमा चांगला कलेक्शन करू शकणार, अशी अपेक्षा लावली जात आहे. ट्रेलरला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचा परिणाम अॅडव्हान्स बुकिंगवर होत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकताच आता ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. तसेच अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच सिनेमाने जोरदार धमाका केल्याचे बघायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘ड्रीम गर्ल-2’ ने २२ आॅगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. ड्रीम गर्ल-2 ने आत्तापर्यंत PVR, INOX आणि Cinepolis मध्ये ६० हजार तिकिटे विकल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ ड्रीम गर्ल-2 सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’ नंतर हा सिनेमा देखील ब्लाॅकबस्टर ठरणार की नाही? याकडे आता चाहत्यांचे डोळे लागले आहे. एकता आर कपूर आणि शोभा कपूर निर्मित ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Chandrayan 3 च्या लँडिंगबाबत आर माधवनचा आत्मविश्वास का वाढला?

या सिनेमात आयुष्मानबरोबर अनन्या पांडे, परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘ड्रीम गर्ल-2’ हा सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या सिनेमाचा सिक्वेल आहे. या सिनेमामधील आयुष्मानच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. परंतु आता ‘ड्रीम गर्ल-2’ या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा राज शांडिल्य यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा आयुष्मान खुराना हा पूजाच्या पात्रातून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करत असताना बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube