Marathi Films Raja Shivaji and Deulband 2 release same day : ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. मात्र या चित्रपटाच्या रिलीजच्या दरम्यानच मराठीतील आणखी मोठा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी कशी असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
पोटनिवडणुकीत वहिनी का हरल्या?…, धनंजय देशमुख यांनी सांगितलं राज’कारण
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे नेतृत्व अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून रितेश विलासराव देशमुख यांनी केले असून, त्यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवचरित्रावर आधारित असलेला हा चित्रपट केवळ ऐतिहासिक कथा मांडत नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणादायी गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच इतिहास आणि स्वाभिमानाच्या मुळाशी असलेल्या या भव्य चित्रपटानुभवासाठी प्रेक्षक आपल्या जागांचे आरक्षण आताच निश्चित करू शकतात.
श्रीवर्धन ते कान… मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ ची आंतरराष्ट्रीय झेप !
दुसरीकडे प्रवीण तरडे आणि प्रणित कुलकर्णी यांच्या देऊळ बंदचा दुसरा भाग येत आहे. अकरा वर्षांपूर्वी जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. टीव्हीवरही या चित्रपटाची लोकप्रियता प्रचंड होती. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणार हा चित्रपट पाहण्यासाठी एक मोठा निष्ठावान प्रेक्षकवर्ग आतुर आहे. प्रवीण तरडे यांचा आजवरचा सक्सेस रेट पाहता देऊळ बंद टू हा राजा शिवाजीला तगडी फाईट देणार यात शंका नाही.
जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर जपानमध्ये 10 जुलैला होणार प्रदर्शित
दरम्यान एकीकडे मराठीमध्ये एवढे मोठे ग्रँड सिनेमे वारंवार बनत नाहीत. अगोदरच मराठी चित्रपटांची अवस्था बिकट असल्याचे स्थिती कलाकारांनी इतर मंडळींकडून मांडली जाते. त्याचबरोबर असे दोन मोठे सिनेमे एकाच वेळी बॉक्स ऑफिसवर आल्यानंतर त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण होते. मात्र या दोन चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर दोन्ही चित्रपटांची विषय एकदम वेगळे आणि ताकदीचे आहेत. त्यामुळे प्रेक्षक दोन्हींनाही भरभरून प्रतिसाद देतील. अशी आशा आहे. त्याचबरोबर एकीकडे मे महिन्याचा सुट्ट्यांचा काळ असल्याने फॅमिली ऑडियन्स देखील मोठा ओढा या दोन्ही चित्रपटांकडे असू शकतो.
