जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा धुरंधर जपानमध्ये 10 जुलैला होणार प्रदर्शित
या चित्रपटाने जगातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवे मार्ग खुले केले आहेत.
Dhurandhar will be released in Japan on July 10th. : जगभरात शानदार आणि विक्रमी बॉक्स ऑफिस यश मिळवल्यानंतर जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजची ‘धुरंधर (पार्ट 1)’ हा चित्रपट आता 10 जुलै 2026 रोजी जपानमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जपानमध्ये प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने जगातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवे मार्ग खुले केले आहेत. 5 डिसेंबर 2005 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित झालेल्या या स्पाय-अॅक्शन चित्रपटाने जगभरात तब्बल 1328 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
‘धुरंधर (पार्ट 1)’ ने आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश मिळवले आहे. उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरण्याचा मान या चित्रपटाने मिळवला आहे. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला असून युनायटेड किंगडममध्येही हा चित्रपट अव्वल कामगिरी करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये गणला जातो. भव्य निर्मितीमूल्य, दमदार कथा आणि वेगळ्या जॉनरच्या आकर्षणामुळे ‘धुरंधर’ जपानी प्रेक्षकांशी जोडला जाण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अॅक्शन, भावना आणि सखोल कथानकाचा सुरेख संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि खिळवून ठेवणारा सिनेमॅटिक अनुभव मिळतो.
1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हिंदी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘धुरंधर’ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाने अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह यांच्यासह संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांची प्रमुख भूमिका आहे. हा हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आदित्य धर यांनी लिहिला, दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. तर ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांनी सहनिर्मिती केली आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि बी62 स्टुडिओज निर्मित ‘धुरंधर’ आता 10 जुलै 2026 रोजी जपानमधील चित्रपटगृहांमध्ये आपली छाप सोडण्यासाठी सज्ज आहे.