Marathi Natak Karun Gelo Gaav: गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाने आपलं रौद्र रूप दाखवले आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या इर्शाळवाडी गावात मोठी दुर्घटना घडली होती. या गावामध्ये मोठी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव एका रात्रीमध्येच नाहीसे झाल्याचे बघायला मिळाले होते. या घटनेला आता काही दिवस उलटून गेले आहेत.
आता गावकरी मधून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आणि त्यांचे संसार पुन्हा एकदा सुरळीत उभे करण्यासाठी ‘करून गेलो गाव’ नाट्य निर्माते राहुल भंडारे आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मोठी मदत केल्याचे बघायला मिळत आहे. ‘अद्वैत थिएटर आणि अश्वमी थिएटर निर्मित ‘करून गेलो गाव’ या नाटकाचा नुकताच अमृत महोत्सवी प्रयोग झाला आहे. या निमित्ताने ३ प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. १५ ऑगस्ट दिवशी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे हे प्रयोग पार पडला आहे.
या नाटकातील तीनही प्रयोगांच्या उत्पन्नापैकी ठराविक रक्कम इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना देण्याचा निर्णय निर्मात्यांनी यावेळी हाती घेतला होता. आता हे प्रयोग पार पडले आहे. यामधून १ लाखाची मदत निधी इर्शाळवाडी गावासाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भोजणे यांच्या ‘करून गेलो गाव’ या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे संपन्न झाल्याचे बघायला मिळत आहे. अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त निर्मात्यांनी ३ प्रयोगांचे नियोजन करण्यात आले होते.
Sai Lokur: कुणी तरी येणार गं! बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज
सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने करून गेलो गाव नाटकाचे निर्माते राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी निधी म्हणून १ लाखाची मदत करण्यात आली आहे. ही निधी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या तिन्ही प्रयोगांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. रायगडमधील निसर्ग संपन्न असं इर्शाळवाडी हे गाव एका रात्रीमध्ये होत्याचं नव्हते झाल्याचे बघायला मिळाले. पावसामुळे कोसळलेल्या दरडीने संपूर्ण गाव नाहीसं झालं. गावात असलेली सगळीच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली उद्ध्वस्त झाल्याचे बघायला मिळाले आहे. या संकटातून इर्शाळवाडीच्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आता अनेकजण तसेच काही कलाकार मदतीचे हात पुढे करत असल्याचे बघायला मिळत आहे.