Sai Lokur: कुणी तरी येणार गं! बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज

Sai Lokur: कुणी तरी येणार गं! बिग बॉस फेम सई लोकूर होणार आई; फोटो शेअर करुन दिली गुडन्यूज

Sai Lokur Post: ‘बिग बॉस मराठी’तून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. (Sai Lokur) तिने अनेक सिनेमात देखील काम केलं आहे. सध्या सई मनोरंजन विश्वापासून थोडीशी लांब झाल्याचे बघायला मिळत आहे. (Tirthadeep Roy) असं असलं तरी ती सोशल मीडियावरुन (Social media) चाहत्यांच्या कायम संपर्कात राहत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)


सईने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिल्याचे पाहायला मिळत आहे. सई घरी लवकरच चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणारअसल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. सईनं तीर्थदीपबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. या फोटोत सईच्या हातात प्रेग्नन्सी टेस्ट किट दिसून येत आहे. या फोटोला सईनं कॅप्शन दिले आहे की, ‘प्रेम आणि कृपेने आमचे कुटुंब वाढत आहे. आम्‍हाला तुम्‍हाला कळवण्‍यास अत्‍यंत आनंद होत आहे, आमच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहूण्याचं आगमन होणार आहे.

सईनं तीर्थदीप रॉयबरोबर 2020 मध्ये लग्न बंधनात अडकली होती. सई ही तीर्थदीपसोबतचे रोमँटिक फोटो कायम सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे बघायला मिळत असते. सई लोकूरनं बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. बिग बॉस मराठीमुळे सईला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

Box Collection: खिलाडीच्या ‘ओह माय गॉड २’ ने रचला इतिहास; ‘इतक्या’ कोटींचा टप्पा केला पार

सईनं ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे, पकडा गया, मिशन चॅम्पियन, प्लॅटफॉर्म, पारंबी, आम्हीच तुमचे बाजीराव, अशा सिनेमामध्ये काम केल्याचे दिसत आहे. सई ही कायम सोशल मीडियावर अनेक प्रकारचे पोस्ट शेअर करत असते. गेल्या काही दिवसापासून सई सध्या फुकेत येथे ट्रीपला गेल्याचे बघायला मिळत होते. या ट्रीपचे फोटो सईनं सोशल मीडियावर शेअर केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube