Box Collection: खिलाडीच्या ‘ओह माय गॉड २’ ने रचला इतिहास; ‘इतक्या’ कोटींचा टप्पा केला पार
OMG 2 Box Office Collection: बॉलिवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ओह माय गॉड’ सिनेमा चांगलाच गाजला होता. ११ ऑगस्ट दिवशी या सिनेमाचा सिक्वेल ‘ओह माय गॉड २’ प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक होते. सोबतच सेन्सॉर बोर्डाने (Censor Board) कात्रीत अडकल्याने देखील या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली होती.
View this post on Instagram
सनी पाजीचा ‘गदर २’सारखा मोठा सिनेमा समोर असताना देखील ‘ओएमजी २’ने बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड करत असल्याचे बघायला मिळत आहे. पहिल्या दिवशी १० कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाची दिवसागणिक होणारी कमाई वाढत असल्याचे दिसत आहे. सोमवारी सिनेमाच्या कमाईमध्ये घट जरी झाली असली, तरी देखील १५ ऑगस्ट या सुट्टीच्या दिवशी सिनेमाने १७.१० कोटींची कमाई करत एक अनोखा रेकॉर्ड केल्याचे दिसत आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार ‘ओह माय गॉड २’ने जगभरात एकूण १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात या सिनेमाने ८० कोटींचा गल्ला केला आहे. सिनेमा समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी देखील याबद्दल ट्वीट करत या सिनेमाचे कौतुक केल्याचे बघायला मिळाले आहे. चाहत्यांनी देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे.
Box Collection: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; सहाव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला
तसेच लैंगिक शिक्षणावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डने ‘ए सर्टिफिकेट’ दिले होते, परंतु तरी हा सिनेमा लहान मुलांसाठी असल्याचा दावा यातील कलाकार आणि चाहते करत आहेत. या सिनेमाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून २० कट सुचवण्यात आले होते. याअगोदर हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘जिओ सिनेमा’ सोबत निर्माते डील करत होते. कदाचित ९० कोटींना हा करार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु नंतर अचानक हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.