पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होणार रमाची पहिली वटपौर्णिमा; रंगणार फुगड्यांची स्पर्धा

Marathi Serial ‘रमा राघव’ मालिकेत रमाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पुरोहितांच्या पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होणार आहे.

Rama Raghav पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होणार रमाची पहिली वटपौर्णिमा; रंगणार फुगड्यांची स्पर्धा

Rama Raghav

Marathi Serial Rama Raghav Celebration of Vat Paurninma : कलर्स मराठी या मराठी वाहिनीवरील ‘रमा राघव’ (Rama Raghav) मालिकेत सोमवार 24 जूनच्या भागात वटपौर्णिमेनिमित्त पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा रंगणार आहे. रमाची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा पुरोहितांच्या पारंपारिक रीतिरिवाजांनी संपन्न होत असून त्याचाच एक भाग असलेली पारंपारिक फुगड्यांची स्पर्धा खास रंगणार आहे.

मतांसाठी शिक्षकांना पैठणी, सोन्याच्या नथीचं प्रलोभन; हेरंब कुलकर्णींकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

रमा ही स्पर्धा जिंकणार की पुरोहितांची थोरली सून म्हणून घरात दाखल झालेली पद्मिनी हा मान मिळवणार हा उत्कंठावर्धक सामना या भागांमध्ये पाहायला मिळेल. रमाच्या चांगुलपणामुळे सहानभूती मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या पद्मिनीचे खरे रूप यानिमित्ताने रमासमोर यावे ही प्रेक्षकांची अपेक्षा या निमित्ताने पूर्ण येईल का याचीही उत्सुकता आहे.

मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, राधाकृष्ण विखेंचं जरांगेंवर टीकास्त्र

या अगोदर रमा आणि राघवचा लग्नसोहळा देखील पारंपारिक पद्धतीने थाटात पार पडला होता. रमा राघवचे बहुप्रतीक्षित विधिवत लग्न पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबांच्या जल्लोषात थाटामाटात रंगले होते. . अलीकडे दुर्मिळ होत चाललेले सगळे मराठमोळे लग्नविधी या सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवता आले.

पेशवाई पेहराव आणि रमा राघव मंगळसूत्र: या मराठमोळ्या लग्नसोहळ्यात पेशवाई पेहराव हे वेगळेपण होते. राघवचे राजबिंडे रूप आणि रमाचे खुलून आलेले खानदानी सौंदर्य विलोभनीय होते. पारंपरिक पोशाख, दागिने यांनी सजलेल्या या सोहळ्यात रमाचे ‘रमाराघव’ मंगळसूत्र ही वेगळेपणामुळे चर्चेत आले होते.

Exit mobile version