‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा

Marathi Serial : कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेत (Marathi Serial) येत्या रविवारी ११ फेब्रुवारीला महारविवार आणि सोमवारी १२ फेब्रुवारीला महासोमवार असा मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘रमा राघव’ या मालिकेत संस्काराने बदलेल्या आणि प्रेक्षकांना आपल्याश्या वाटणाऱ्या रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा या महारविवारमध्ये सुरू होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंविरोधात गुन्हा दाखल; […]

Marathi Serial ‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा

Marathi Serial

Marathi Serial : कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या लोकप्रिय मालिकेत (Marathi Serial) येत्या रविवारी ११ फेब्रुवारीला महारविवार आणि सोमवारी १२ फेब्रुवारीला महासोमवार असा मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘रमा राघव’ या मालिकेत संस्काराने बदलेल्या आणि प्रेक्षकांना आपल्याश्या वाटणाऱ्या रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा या महारविवारमध्ये सुरू होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंविरोधात गुन्हा दाखल; ‘निर्भय बनोची’ सभा उधळून लावण्याचा भाजपचा इशारा

या माघी गणपती विशेष भागात ‘श्री गणेशा’च्या दैवी संकेताने रमा पौरोहित्याचा वसा घेणार आहे. हा रंजक टप्पा कसा उलगडणार हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. अर्थात रमाने उचलेले हे पाऊल, पुरोहित कुटुंबासाठी घेतलेला हा धाडसी निर्णय तितकाच आव्हानात्मक आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला रमा कशी सामोरी जाते, हे महासोमवार मध्ये घडणारे नाट्य विलक्षण रंजक आहे.

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?

घरातली स्त्री ज्ञान देणारी सरस्वती,समृध्दी देणारी लक्ष्मी असते तशीच घराच्या संरक्षणासाठी दुर्गा बनते, हा रमाचा विचार आणि त्यासाठी तिने घेतलेला दुर्गावतार ‘न भूतो न भविष्यति’ असा आहे. रमा म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणते, मालिकेत एक नवं वळण आलं आहे. रमाला आतापर्यंत सगळ्यांनी अनन्याला तोंड देतांना पाहिलं आहे. पण आता पुन्हा ती तिच्या जुन्या आवतारात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत ती तिच्या प्रेमाखातर, कुटुंबखातर शांत होती पण आता रमा दुर्गा रुपात पाहायला मिळणार आहे.

‘सरकारमधील नेत्यांमध्येच मुख्यमंत्री होण्यासाठी सत्तास्पर्धा’; थोरातांची खोचक टीका

स्वतःच्या कुटुंबाचं सौरक्षण करण्यासाठी हे रूप तिने घेतलं आहे. एक महिला हे सुद्धा करू शकते हे खरच खूप प्रेरणादायी आहे माझ्यासाठी. बोल्ड अँड ब्युटिफुल रमा आता संस्कारांना जपून ती कुटुंबाला सावरते हे पाहणं रंजक ठरेल. ही भूमिका साकारताना जी सकारात्मकता होती, ती प्रेक्षक म्हणून तुम्ही अनुभवू शकाल, तुम्हाला निश्चितच भावेल.‘रमा राघव’च्या एकत्र प्रवासातला हा उत्कंठावर्धक टप्पा नात्यांचे नवे पदर उलगडत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

Exit mobile version