Download App

प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांचे भावी जीवनाचे सूरही जुळले…

  • Written By: Last Updated:

Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan : झी मराठी या वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन होय. या दोन्ही गायक कलाकारांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात देखील त्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत सोशल मीडियावर आपला फॅन बेस तयार केला आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यांच्या व्हिडीओला  लाखोंमध्ये व्ह्यूज जातात.

पण आता या दोघांची नावे एका विशेष कारणाने चर्चेत आली आहेत. त्याचे कारण आहे की, ही जोडी आता विवाह बंधनात अडकणार आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,  ठीक आहे! तर! जसे की, तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून बातमी किंवा घोषणेची अपेक्षा आहे! अखेर आता नक्की! आमचं ठरलंय!, असे या दोघांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुग्धा आणि प्रथमेश हे दोघेही शास्त्रीय गायक आहेत. या दोघांनी ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालवयातच गायनाला सुरुवात केली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून  दोघांची नावे अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाली. त्यानंतर सातत्याने या दोघांनी गायनाच्या माध्यमातून रसिकांची मने जिंकण्याचे काम केले.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

सोशल मीडियावर अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी विचारले जायचे. तसेच अनेक गायनाच्या कार्यक्रमांमध्ये मुग्धा आणि प्रथमेश यांची जोडी पाहायला मिळायची. काही प्रेक्षक तर विशेष करून मुग्धा आणि प्रथमेश या दोघांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर दोघांवरती शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अनेकांनी त्यांना आपल्या भावी विवाहित आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहे.

Tags

follow us