Mardani 3 : नवरात्रीच्या मुहूर्तावर यशराज फिल्म्सकडून मर्दानी 3 चित्रपटाचा नवं पोस्टर प्रदर्शित केलंय. अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा सर्वांच्या मनात घर करणार आहे. राणी मुखर्जी एका शूर महिला पोलिस अधिकाऱ्याच्या रुपात चित्रपटात झळकणार आहे.
पुढील 4 दिवस महत्वाचे! अहिल्यानगरसह राज्यात मुसळधार पावसाचा कहर, हवामान विभागाचा अलर्ट जारी
यशराज फिल्म्सने नवरात्रीची सुरुवात खास करत मर्दानी 3 चा नवा पोस्टर लाँच केला आहे. या पोस्टरमध्ये चांगल्या आणि वाईटाच्या दरम्यान होणाऱ्या आगामी महासंग्रामाची चाहूल मिळणार आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा सर्वांच्या मनात घर करणाऱ्या तिच्या शूर पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय या भूमिकेत परतत आहे.
प्रतिकात्मक अंत्ययात्रा अन् श्वानाच्या गळ्यात फोटो; गोपीचंद पडळकरांविरोधात कोल्हापुरात निषेध आंदोलन
पोस्टरसह जोडण्यात आलेल्या ‘ऐगिरी नंदिनी’ या शक्तीशाली स्तोत्राचा गजर, माता दुर्गेने महिषासुराचा वध करताना दाखवलेल्या सामर्थ्याचा गौरव करत आहे. एका क्रूर प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी शिवानीला स्वतःचं जीवन धोक्यात घालून अपार धैर्य दाखवावं लागणार असल्याचं चित्रीकरण या चित्रपटात असणार आहे.
तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही! शिवाजी वाटेगावकरांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड दम
मर्दानी सीरीज जी भारतातील एकमेव यशस्वी महिला-प्रधान चित्रपट फ्रँचायझी आहे. आपल्या प्रभावी कथांमुळे प्रेक्षकांच्या मनात सतत ठसा उमटवत आली आहे. या कथा समाजासाठी डोळे उघडणाऱ्या ठरल्या असून आपल्या देशात रोज घडणाऱ्या भयानक गुन्ह्यांकडे सगळ्यांना पाहायला भाग पाडतात.
2014 मधील मर्दानी आणि 2019 मधील मर्दानी 2 या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर तिसरा अध्याय आणखी गडद आणि कठोर ठरणार असून प्रेक्षकांना थेटरमध्ये थरारक आणि रोमांचकारी अनुभव देणार आहे. आदित्य चोप्रा हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पोस्टर इथे पाहा: https://www.instagram.com/reel/DO5JPBCCKL-/?igsh=em9vOHJqM214MW02