नव्या पिढीसाठी थिंक-टॅंक, समित्यांच्या सूचनांची 30 सप्टेंबरपर्यंत प्रत द्या; चिंतनशिबिरात अजित पवारांच्या सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटना, अर्थकारण आणि आगामी निवडणुकांवर थेट भाष्य केले.

NCP Ajit Pawar Chintan Shibir At Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटना, अर्थकारण आणि आगामी निवडणुकांवर थेट भाष्य केले. शिबिरात बोलावले न गेलेले अनेक कार्यकर्ते बाहेर जमले होते, तर आत नव्या पिढीचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. हे चिंतन शिबीर नागपुरमध्ये पार पडले.
समित्यांमध्ये कोणाची नियुक्ती?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, पक्षात आता नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येत असून संघटनेतील गोंधळ सोडवण्यासाठी 10 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी केलेल्या चर्चा, घेतलेले निर्णय आणि दिलेल्या सूचनांची (Maharashtra Politics) प्रत 30 सप्टेंबरपर्यंत द्यावी. समित्यांमध्ये कोणाची नियुक्ती झाली, ते किती वेळ कामात सहभागी झाले याची नोंद करणे (NCP) बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवारांनी सूचित केले की अनेकदा समितीत स्थान दिल्यानंतर (Nagpur) व्यक्तीकडून नागरिकीकरण किंवा वैयक्तिक फायद्यासाठी दबाव टाकला जातो. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून प्रत्येक समितीच्या प्रमुखांनी स्पष्ट आणि नीटनेटकी अहवाल प्रत्यक्ष द्यावी.
पक्षाची थिंक टॅंक आवश्यक
आपल्या पक्षालाही वर्षभराची ठोस भूमिका असावी. काँग्रेसच्या काळात संघटनेला महत्त्व दिले गेले, तिथून रोजगार हमी योजनेसारख्या योजना आल्या. आपणही संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवले होते. आज थिंक-टॅंक असावी, पक्षाचे प्रवक्ते घडवले गेले पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले. नंदुरबारमधील उदाहरण देताना ते म्हणाले, पूर्वी फक्त पंजा चालायचा, पण गावित साहेबांनंतर घड्याळ तिथे रुजले. जिल्हा परिषद आपल्याकडे होती. आता मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना होणार आहे. पुण्यात आज 8 मतदारसंघ आहेत, उद्या 11 होतील. पिंपरी-चिंचवडचे तीन मतदारसंघ 4 किंवा 5 होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कर्जस्थितीवर थेट भाष्य
राज्याच्या अर्थकारणावर बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्रावर 9 लाख 32 हजार कोटींचे कर्ज आहे. 2016-17 साली स्थूल उत्पादन 22 लाख कोटी होते, तेव्हा कर्ज 3 लाख 64 हजार कोटी म्हणजे 16 टक्के होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही अर्थसंकल्प व्यवस्थित सांभाळला. केंद्र सरकारच्या धोरणानुसार जीडीपीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी कर्ज असावे लागते. महाराष्ट्राचे कर्ज सध्या 19 टक्के आहे. नैसर्गिक आपत्ती, कोरोना यामुळे ताण आला. 2016-17 मध्ये 16 टक्के होते, कोरोना काळात 17 टक्क्यांवर पोहोचले, आता 25-26 मध्ये 18 टक्क्यांवर गेले आहे. देशात गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र हे तीन राज्ये केंद्राने घालून दिलेल्या मर्यादेत आहेत, असे ते म्हणाले.
आगामी निवडणुका व योजना
नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आपण राबवल्या. लोकांच्या अडचणींना उत्तर देणे हेच आपले ध्येय आहे, असे पवारांनी कार्यकर्त्यांना बजावले. पक्ष प्रवेश देताना चांगल्या माणसाला प्रवेश द्या. अन्यथा सोशल मीडियावर ट्रोल होण्याची वेळ येईल. प्रत्येकाच्या परिश्रमांचा सन्मान केला पाहिजे. सुनेत्रा पवार यांनी ‘कुणाला संधी द्यायची हे बघायला हवे’ असे सांगितले आहे. त्यांची सूचना पाळली असती तर पक्ष अधिक मजबूत झाला असता.
शांत राहणेच योग्य
राजकीय टीकाटिप्पणींवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काही लोक जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष्य करतात. एक महिला मला उलट बोलली, मी शांत राहिलो. उत्तर देऊ शकलो असतो, पण आपण शांत राहणेच योग्य आहे. लोक ठरवून बोलतील, आपण काम करत राहावे.