Download App

Matthew Perry: ‘फ्रेंड्स’ फेम अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं अखेर ‘ते’ सत्य उलगडलं! डॉक्टर म्हणाले…

Matthew Perry Death Reason reveals: ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता आणि वेब शो ‘फ्रेंड्स’ स्टार मॅथ्यू पेरी (Matthew Perry) यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. (Matthew Perry Death ) वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला होता, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून, त्यात त्यांचा मृत्यू अपघाती नसून त्यामागे दुसरे काही कारण असल्याचे समोर आले आहे. केटामाइनच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. लॉस एंजेलिस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षक कार्यालयानेही याबाबतचे निवेदन जारी केले आहे.

मॅथ्यू पेरी प्रकरणात, लॉस एंजेलिस काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॅथ्यूच्या मृत्यूचे कारण केटामाइन होते, जे त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात आढळले. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत निवेदनात सांगितले आहे की, त्यांचा मृत्यू बुडणे, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि बुप्रेनॉर्फिनमुळे झाला आहे. अहवालात असे सांगितले आहे की, केटामाइनची पातळी शस्त्रक्रियेमध्ये सामान्य भूल म्हणून वापरल्या जाणार्‍या उच्च दर्जाच्या पातळीच्या समतुल्य आहे. यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आणि ते बेशुद्ध पडले. यानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूनंतर, मॅथ्यू पेरीचा मृतदेह लॉस एंजेलिसमधील त्याच्या घराच्या बाथरूममध्ये सापडला होता. यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.

Anup Ghoshal Death: ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ फेम गायक अनुप घोषाल यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

अभिनयाचा वारसा मिळाला

मॅथ्यू पेरीबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जायचा. अभिनयाचा वारसा त्यांना मिळाला. तो सुप्रसिद्ध अभिनेता जॉन बेनेट पेरी आणि सुसान मेरी लँगफोर्ड यांचा मुलगा होता. त्यांचा जन्म 1969 मध्ये झाला. लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, तो एक वर्षाचा असताना त्याच्या आई-वडिलांचे नाते संबध तुटले. ‘चार्ल्स इन चार्ज’मध्ये पाहुण्यांच्या भूमिकेतून अभिनेत्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्याने ‘बेवर्ली हिल्स 90210’ सारख्या शोमध्ये काम केले. त्याला ‘फ्रेंड्स’मधून ओळख मिळाली. यासोबतच त्याने ‘फूल्स रश इन’, ‘द होल नाइन यार्ड्स’, ‘थ्री टू टँगो’, ‘द किड’, ’17 अगेन’ आणि ‘गेटिंग इन’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tags

follow us