Rani Mukharjee Mardaani Movie : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) सध्या जोरदार चर्चेत आल्या आहेत. मीरा यांनी १९९४ मध्ये जळगावातील सर्वात मोठं सेक्स स्कँडल रॅकेट उघडकीस आणलं होत. आणि त्या आरोपींवर कारवाई केली होती. मीरा यांनी ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) हे पुस्तक लिहिलं आहे. मात्र या पुस्तकावरुन ते वादात सापडल्याचे दिसत आहे. मीरा बोरवणकरांच्या कामगिरीवर आधारित २०१४ आणि २०१९ मध्ये ‘मर्दानी’ या सिनेमाचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले होते. आणि चाहते आता त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत.
कोण आहेत मीरा बोरवणकर?
मीरा बोरवणकर सध्या देशभरात ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखले जात आहेत. मीरा या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. १९८१ बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे पती अभय बोरवणकर हेदेखील आयएएस अधिकारी होते. सध्या मात्र ते व्यवसाय करत आहेत. मीरा आयपीएस अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईसह अनेक मोठ्या शहरात त्यांनी आपलाही कामगिरी बजावली आहे. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेकांना तुरुंगात टाकण्यात त्यांची मुख्य भूमिका बजावली आहे.
परंतु जळगाव येथील सेक्स स्कँडलमुळे त्याच्या आयुष्यात प्रकाशझोतात आल्याचे बघायला मिळाले आहे.मीरा बोरवणकर यांच्या जळगाव सेक्स स्कँडलमधील कामगिरी मर्दानी’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुख्य भूमिकेमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. सिनेमात राणी मुखर्जी यांनी साकारलेल्या पोलिस ऑफिसरचं नाव शिवानी शिवाजी रॉय असे असणार आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.
Letsupp Special : बोरवणकरांच्या आरोपांमुळे अजितदादा अडचणीत; पण ‘तो’ बिल्डर नेमका होता तरी कोण?
‘मर्दानी’ या सिनेमाचं दिग्दर्शनाची धुरा प्रदीप सरकार यांनी सांभाळली आहे. या सिनेमात राणी मुखर्जी यांच्यासह ताहिर राज भसीन, जिशू सेनगुप्ता, सानंद वर्मा आणि अवनीर कौर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारले होते. २०१९ मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग चाहत्यांचे परत एकदा मनोरंजन करण्यासाठी भेटीला आला होता. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत आहे.