माधुरीने रेणुका आणि प्रिया सोबतच्या सेटवरील धम्माल आठवणींना कोण होणार करोडपतीच्या मंचावर दिला उजाळा!

एकाच खोलीत राहण्यापासून ते मराठीतून गप्पा मारण्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा देताना सेटवरील मैत्री आणि धमाल पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

Untitled Design   2026 10 18T143922.162

Untitled Design 2026 10 18T143922.162

Memories were revisited on the stage of ‘Kon Honar Crorepati’! : ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे आणि प्रिया बेर्डे यांची खास भेट रंगणार असून, या तिघी ‘हम आपके हैं कौन’च्या चित्रीकरणादरम्यानचे मजेशीर किस्से सांगताना दिसणार आहेत. एकाच खोलीत राहण्यापासून ते मराठीतून तासनतास गप्पा मारण्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा देताना सेटवरील मैत्री आणि धमाल पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. सेटवर अनेक मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ असल्यामुळे आणि त्यांची धमाल बघून दिग्दर्शक सूरज बडजात्या शॉट्सच्या मधल्या वेळेत मराठी चित्रपट बनवू शकतो, असं गमतीनं म्हणायचे.

हम आपके हैं कौन च्या शूट आधी कलाकारांची नावं समजल्यानंतर झालेला आनंद व्यक्त करताना माधुरी दीक्षित म्हणाली, “मला जेव्हा चित्रपटाची पटकथा मिळाली, तेव्हा यामध्ये आणखी कोण काम करत आहे, हे माहीत नव्हतं. पण जेव्हा समजलं की तुम्ही दोघीही या चित्रपटात आहात, तेव्हा मला खूप आनंद झाला. आता कोणीतरी असेल, ज्यांच्याशी मी मराठीत बोलू शकेन, गप्पा मारू शकेन आणि मस्ती करू शकेन, असं वाटलं. तुम्हा दोघींना भेटल्यानंतर खूप आपलेपणा जाणवला. तुम्ही मला माझ्या बहिणीच वाटायचात.”

‘आयएएस व्हा’ असं मी सांगणार नाही, तरुणाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंचं रोखठोक उत्तर, भूमिका केली स्पष्ट

यावर प्रिया बेर्डे माधुरी दीक्षितला म्हणाल्या, “तुम्ही सुरुवातीपासूनच खूप सहज आणि आपुलकीनं वागायचात. तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकार आहात, हे तुम्ही कधीच जाणवू दिलं नाहीत. चित्रीकरणादरम्यान आपण एकाच खोलीत राहायचो. वेगळी खोली किंवा स्वतंत्र व्हॅनिटी व्हॅन असावी, असं कधी वाटलंच नाही. त्या काळातील सगळी धमाल आजही आठवते.”

मराठीतून चालणाऱ्या गप्पा आणि इतर धम्माल बघून सेटवर इतरांना हेवा वाटायचा अशी पुस्ती यावेळी माधुरीने जोडली. माधुरीनं यावेळी ऊटी येथे झालेल्या आऊटडोअर चित्रीकरणाच्या आठवणीही सांगितल्या. याच ठिकाणी ‘धिकताना’ हे गाणे आणि क्रिकेट सामन्याचं गाजलेलं दृश्य चित्रित करण्यात आलं असल्याची आठवण माधुरीनं सांगितली.

राज्यात हवामानाचा डबल गेम! एका बाजूला उकाडा, तर दुसरीकडे महाराष्ट्रासह 16 राज्यांत वादळी पावसाचा इशारा

मराठी गँगच्या धमाल आठवणींना उजाळा देताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “सेटवर अनेक तंत्रज्ञही मराठी होते. त्यामुळे सेटवर मराठीतून भरपूर गप्पा व्हायच्या. शॉट्सच्या मधल्या वेळेत सूरजजी गंमतीनं म्हणायचे, ‘इथे इतके मराठी लोक आहेत की, चित्रीकरणाच्या ब्रेकमध्ये आपण एक मराठी चित्रपटही बनवू घेऊ!” पाहा ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार, रात्री 9 वाजता, सोनी मराठी आणि सोनी लिववर!

Exit mobile version