Download App

Merry Christmas: ‘मेरी ख्रिसमस’ च्या रीलीजपूर्वी विजय सेतुपतीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

Merry Christmas: “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली, कारण अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) तिचा सहकलाकार प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजय सेतुपतीने चित्रपटाच्या सेटवर कैटरीना कैफच्या अभिनय कौशल्याबद्दल आणि व्यावसायिकतेबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे.

कतरिनाच्या अभिनय कौशल्याची आणि व्यावसायिकतेची प्रशंसा करताना तो म्हणाला, “कतरिना ची काम करण्याची पद्धत पाहून मी थक्क झालो आहे. ती एक उत्तम व्यावसायिक आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला.” या पत्रकार परिषदेत “नजर तेरी तुफान” हे गाणं प्रदर्शित करण्यात आल. प्रख्यात संगीतकार प्रीतम चक्रवर्ती आणि गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी संगीतबद्ध केलेल हे खास गाणं प्रसिद्ध गायक पापोन यांनी गायलं आहे. कतरिनाच्या तमिळ पदार्पणासाठी हा चित्रपट उल्लेखनीय ठरणार आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित “मेरी ख्रिसमस,” 12 जानेवारी, 2024 रोजी हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी मध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. तर तमिळ मध्ये कतरिना आणि विजय सेतुपतीसह राधिका सरथकुमार, गायत्री, षण्मुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स दिसणार आहेत. ज्यामुळे स्क्रीनवर डायनॅमिक आणि वैविध्यपूर्ण कलाकार बघायला मिळणार आहे.

Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’

कालच ‘मेरी ख्रिसमस’ मधील “नजर तेरी तुफान” (Nazar Teri Tufan Song ) हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नवीन गाण्याच्या रिलीजने चाहत्यांमध्ये आणि संगीत रसिकांमध्ये उत्साहाचा वाढला आहे. मनमोहक चाल आणि मनमोहक गीतांनी हे गाणे संगीत उद्योगात धुमाकूळ घालत आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलेले “नजर तेरी तुफान,” हे गाणं पारंपारिक आणि समकालीन संगीताचा मिलाफ आहे. प्रीतमचा सिग्नेचर टच या गाण्यातून दिसून येतोय. पापोनने हे गाणे सुंदर गायले आहे आणि प्रख्यात गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

follow us