Minus 31 trailer release: 2019 ची कोरोना (Corona) महामारी हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे, जो आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. दिग्दर्शक प्रतीक मोइत्रो त्याच्या ‘मायनस 31’ (Minus 31) चित्रपटाद्वारे कोरोना काळातील एक पूर्णपणे काली बाजू मंडळी आहे. या कथेने वेगवेगळे मार्ग स्वीकारले असल्याचे दिसून आले आहे. ‘मायनस 31’ कोरोना काळातील परिस्थितीवर आधारित एक रहस्यमय कहाणी असणार आहे.
‘मायनस 31’ चा ट्रेलर काल संध्याकाळी रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांनी इंटरेस्टिंग असे म्हणत कॉमेंट्स करत आहेत. रुचा इनामदार, निशा धर, रघुबीर यादव, राजेश शर्मा, जया भट्टाचार्य, कंभारी, संतोष जुवेकर, शिवंकित परिहार आणि देबाशीष नाहा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत लाँच करण्यात आला, या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. हा कार्यक्रम माध्यमांसाठी खूपच मजेशीर ठरला आहे. यादरम्यान ‘नागपुरी’ अपशब्दांचा खेळ खेळला गेला आहे. त्याबद्दल दिग्दर्शक प्रतीकने मीडियाला स्पष्टीकरण दिले आहे. या कार्यक्रमात रघुबीर यादवचा रॅपिंग करतानाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. ज्याला सोशल मीडिया यूजर्सकडून मोठी पसंती मिळत आहे.
आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?
प्रतीक मोइत्रो दिग्दर्शित, चारुलता मोईत्रो लिखित, ऑरेंजपिक्सेल स्टुडिओ निर्मित, करण विशाल कोंडे, निशिता केणी आणि दर्शनी एंटरटेनमेंट सह-निर्मित, ड्रॅगन वॉटर फिल्म्स द्वारे वितरीत, ‘मायनस 31’- द नागपूर फाईल्स 22 जुलै 21 रोजी संपूर्ण भारतातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.