Download App

Shweta Tripathi: श्वेताचा विकी कौशलसोबत रोमान्स; चित्रपट फ्लॉप ठरला मात्र…

Shweta Tripathi Birthday Special : मिर्झापूर 3 सीझन 5 जुलैपासून ॲमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या सीरीजमध्ये गोलूची भूमिका साकारणारी श्वेता तिवारी ही इतरही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकली आहे.

Mirzapur Shweta Tripathi Special: ओटीटीच्या ‘मिर्झापूर’ (Mirzapur ) या सुपरहिट वेब सीरिजचा तिसरा सीझन 5 जुलैपासून सुरू झाला आहे. तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime) तिन्ही सिरीजचा आनंद घेऊ शकता. या सिरीजमध्ये श्वेता त्रिपाठीने (Shweta Tripathi) गोलू नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. श्वेता त्रिपाठी जितकी गोंडस दिसते तितकीच ती एक अप्रतिम अभिनेत्री देखील आहे. (Shweta Tripathi Birthday) श्वेताने केवळ ओटीटीवरच आपला ठसा उमटवला नाही तर काही चित्रपटही केले आहेत, ज्यापैकी ‘मसान’ हा एक आहे.


श्वेता त्रिपाठी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे पण ओटीटीवर तिची ओळख वेगळ्या पद्धतीने निर्माण झाली. यावर्षी 6 जुलै रोजी म्हणजेच उद्या, श्वेता तिचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे आणि या निमित्ताने तिच्या चित्रपटाबद्दल सांगूया ज्यामध्ये तिची एक छोटी पण प्रभावी भूमिका होती.

कोण आहे श्वेता त्रिपाठी?

6 जुलै 1985 रोजी दिल्लीत जन्मलेल्या श्वेता त्रिपाठीचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत सरकारी कर्मचारी आहेत, तर तिची आई सेवानिवृत्त शिक्षिका आहे. श्वेता त्रिपाठीचे बालपण अंदमान निकोबार आणि मुंबईत गेले. श्वेताने तिचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून केले आणि त्यानंतर तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले. येथून त्यांनी फॅशन कम्युनिकेशनची पदवी घेतली. श्वेता त्रिपाठीने 29 जून 2018 या दिवशी गोव्यात रॅपर आणि अभिनेता चैतन्य शर्मासोबत बोहल्यावर चढली.

श्वेता त्रिपाठी आणि विकी कौशल यांचा चित्रपट

श्वेता त्रिपाठीला 24 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या मसान चित्रपटातून ओळख मिळाली. नीरज घायवानच्या ‘मसान’ चित्रपटातील श्वेता त्रिपाठीची भूमिका खूपच छोटी होती मात्र तिचा प्रभाव संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळाला आहे. छोट्या शहरांच्या कथेपासून सुरू होणारा हा चित्रपट खूपच छोटा आहे आणि बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फ्लॉप झाला.

सॅकनिल्कच्या मते ‘मसान’ चित्रपटाचे बजेट 7 कोटी रुपये होते तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 4.63 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाचा सुपरफ्लॉप ठरला. पण जर या चित्रपटाची खोली समजली असेल तर हा एक उत्तम चित्रपट आहे आणि तुम्ही तो यूट्यूबवर विनामूल्य पाहू शकता. विकी कौशलनेही या चित्रपटातून पदार्पण केले असून त्यात विकी-श्वेताची एक छोटीशी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

Mirzapur 3: मिर्झापूरमध्ये श्वेता त्रिपाठीसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माने थेटच सांगितले; म्हणाला

श्वेता त्रिपाठीची वेब सिरीज

‘मसान’ आणि ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधून श्वेता त्रिपाठीला चांगलीच ओळख मिळाली. याशिवाय त्याने ‘हरामखोर’, ‘ये काली काली आँखे’, ‘कांजूस’, ‘लखों में एक’, ‘मेहंदी सर्कस’, ‘कलकोट’, ‘द गॉन गेम’, ‘रात अकेली है’, या चित्रपटात काम केले आहे. ‘द इलिगल’, ‘रश्मी रॉकेट’, ‘लघुशंका’ सारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

follow us

वेब स्टोरीज