Mission Raniganj Teaser: ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ एका सीनवर चाहते म्हणाले…

Mission Raniganj Teaser: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना नवीन भेट दिली आहे. त्याने त्याच्या आगामी ‘मिशन राणीगंज’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित केला आहे. ५९ सेकंदाचा हा टीझर सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. In […]

Mission Raniganj Teaser

Mission Raniganj Teaser

Mission Raniganj Teaser: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना नवीन भेट दिली आहे. त्याने त्याच्या आगामी ‘मिशन राणीगंज’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित केला आहे. ५९ सेकंदाचा हा टीझर सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

सिनेमाच्या टीझरमधील एका सिंहावर चाहते चांगलेच खूपच फिदा झाल्याचे बघायला मिळत आहे. हा सिनबघितल्यानंतर सोशल मीडियावर युजर्स ‘खिलाडी इज बॅक’ असे ट्वीट करत असल्याचे दिसत आहे. सिनेमाच्या टीझरची सुरुवात ‘राणीगंज कोळसा खाण’ने होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये राणीगंज कोळसा खाणीत सुमारे २२० कामगार अडकल्याचे टीझरमध्ये बघायला मिळत आहे.

स्फोटामुळे भिंत तुटून खाणीमध्ये पाणी तुंबू लागल्याचे दिसत आहे. कामगार मदतीसाठी हाक मारत असतात. परंतु त्यांना एकही व्यक्ती मदत करत नाही. अशा परिस्थितीत खाण अभियंता जसवंत सिंग गिल म्हणजेच खिलाडी (अक्षय कुमार) प्रत्येक कामगाराला सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे बघायला मिळत आहे.

Akshay Kumar : भारत vs इंडिया वादात अभिनेता अक्षय कुमारची उडी, चित्रपटाचं नावंचं बदललं

टीझरमध्ये एक सिन असे दाखवण्यात आला आहे की, यामध्ये मागून ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असा आवाज येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर खिलाडीची एक झलक दिसते. हा एक सीन सिनेमा हिट होण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. यूजर्स या सीनचा फोटो शेअर करत आहेत आणि ‘खिलाडी इज बॅक’ असे ट्वीट करत असल्याचे बघायला मिळत आहे.

Exit mobile version