Akshay Kumar : भारत vs इंडिया वादात अभिनेता अक्षय कुमारची उडी, चित्रपटाचं नावंचं बदललं

  • Written By: Published:
Akshay Kumar : भारत vs इंडिया वादात अभिनेता अक्षय कुमारची उडी, चित्रपटाचं नावंचं बदललं

Akshay Kumar : सध्या देशाच्या नावावरून देशात वाद सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी नेत्यांना जेवणासाठी आमंत्रित केले. यावेळी परदेशी नेत्यांना अधिकृत निमंत्रणे पाठवण्यात आली. या पेपरमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा उल्लेख होता. यानंतर ‘इंडिया’ विरूद्ध भारत असं संघर्ष उभा राहिला. अशाचत आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही चित्रपटाच्या पोस्टरद्वारे ‘भारत’ नावाचे समर्थन केले आहे.

OMG 2 चित्रपटाच्या यशानंतर आता अक्षय कुमार एका नव्या अवतारात दिसणार आहे. त्याचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयने आज या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. टीझरमध्ये तो खाण अभियंता जसवंत सिंग गिलच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षयने आधी लाँच केलेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव ‘मिशन राणीगंज: द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ असं होते. मात्र, ‘इंडिया’ आणि ‘भारत’ वाद सुरू झाल्यावर अक्षयने त्याच्या चित्रपटाचे नाव बदलले. अक्षयने शेअर केलेल्या नवीन पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव बदलून ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ असं केलं आहे.

अक्षयने बुधवारी (6 सप्टेंबर)ला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून स्वर्गीय जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. कोळसा खाणीत अडकलेल्या मुलांचे प्राण त्यांनी वाचवले होते.

मिशन राणीगंज या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई यांनी केले असून वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी निर्मिती केली आहे. तर या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube