मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कारांनी केले सन्मानित

Mithun Chakraborty-Usha Uthup Got Padma Bhushan: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan) मिळाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांनाही (Usha Uthup) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते […]

राष्ट्रपती भवनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान, पाहा फोटो

Padma awards

Mithun Chakraborty-Usha Uthup Got Padma Bhushan: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan) मिळाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांनाही (Usha Uthup) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला. भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कला क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


‘जेव्हा मला फोन आला की तुला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे…’

मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणाकडून माझ्यासाठी काहीही मागितले नाही. जेव्हा मला फोन आला की तुम्हाला पद्मभूषण दिले जात आहे, तेव्हा मी एक मिनिट गप्प बसलो कारण मला ते अपेक्षित नव्हते.

Srikanth : श्रीकांतच्या ‘पापा कहते हैं’ गाण्याच्या लाँचिंगवेळी आमिर खान भावूक, पाहा व्हिडिओ

या सेलिब्रिटींना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला

मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप यांच्याशिवाय भजन गायक श्री कालुराम बामनिया आणि बांगलादेशी गायिका रेझवाना चौधरी बन्या यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मभूषण पुरस्कार कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान, साहित्य आणि क्रीडा यासारख्या श्रेणींमध्ये दिला जातो.

Exit mobile version