Download App

Nitin Desai Death : देसाईंच्या आत्महत्येला कारणीभूत कोण? शेलार, लाड यांचे सभागृहात गौप्यस्फोट

Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना रसेश शहा नावाचे एक गृहस्थ आणि एडलवाईजची असेट रिक्रेशन या कंपनीने कर्ज दिले होते. त्यानंतर याच कर्जाच्या वसूलीची पद्धत आणि व्याजदर यामुळेच देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. असा थेट आरोप आमदार प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांनी केला. ( MLA Ashish Shelar and Prasad Lad Expose name who behind Nitin Desai Death in assembly )

“मलाही त्या खुर्चीवर बसायचं होतं, पण…” : अखेर जयंतरावांच्या पोटातील गोष्ट ओठांवर आलीच!

देसाईंच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभागृहात नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार प्रसाद लाड आणि आशिष शेलार या आत्महत्येप्रकरणी देसाईंना कर्ज देणाऱ्या कंपनीची कसून चौकशी झाली पाहिजे तसेच कर्ज वसुली करत असताना कोणत्या स्तरापर्यंत मानसिक तान दिला गेला पाहिजे. याबाबत सरकारने संबंधित वसुलीदारांची भूमिका जाणून घेतली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली.

काय म्हणाले आशिष शेलार?

नितीन देसाई यांनी एन डी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. चे 252 कोटींचे झाले होते. रसेश शहा नावाचे एक गृहस्थ आणि एडलवाईजची असेट रिक्रेशन या कंपनीने कर्ज दिले होते. या लोकांकडून आधुनिक सावकारी राबवली जात आहे. देसाईंच्या ऑडिओ क्लिप्सची सध्या तपासाणी सुरू आहे. कर्जाच्या व्याजाचा दर, वृद्धी दर, आणि वसुलीची पद्धत याची साधी चोकशी होऊ नये. त्यामुळे रसेश शहा नावाचे एक गृहस्थ आणि एडलवाईजची असेट रिक्रेशन या कंपनीने कर्ज दिले होते. त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शेलार यांनी केली.

काय म्हणाले प्रसाद लाड?

यावेळी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. नितीन देसाई हे माझे जवळचे मित्र होते. नितीन देसाई यांच्यावर जे कर्ज होते. त्यामुळे हा प्रकार घडला असावा. त्यामुळे कर्ज वसुली करत असताना कोणत्या स्तरापर्यंत मानसिक तान दिला गेला पाहिजे. याबाबत सरकारने संबंधित वसुलीदारांची भूमिका जाणून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे नितीन देसाई यांच्या मोबाईलवरील ध्वनीफितीची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे.

विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

ध्वनीफितीत म्हटल्याप्रमाणे कोणत्या हिंदी फिल्म कलाकारासोबत झालेल्या वादामुळे नितीन देसाई यांना काम मिळणे बंद झाले? मराठी कला दिग्दर्शकावर अन्याय करणारा तो हिंदी कलाकार कोण होता? याची चौकशी करा, अशी आग्रही मागणी आमदार लाड यांनी यावेळी केली. तसेच देसाई कुटुंबियांना विश्वासात घेऊन एन डी स्टुडीओ अधिकृतपणे सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, अशी विनंती देखील आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी केली आहे.

त्यानंतर नितीन देसाई यांना सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान शेलार आणि लाड यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असं अश्वासन दिलं.

Tags

follow us