Goregaon Film City: मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला (Goregaon Film City) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) चित्रनगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मराठी, हिंदी सिरीयल आणि सिनेमाचे मोठ्या प्रमाणात शूटिंग होत असतात. परंतु आता या चित्रनगरीतील आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे दिसून आले आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळत असल्याचे दिसत आहे. त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Govt) खडसावले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी… pic.twitter.com/9qMplER72R
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 25, 2023
मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर हे कायमच सिनेसृष्टीबद्दल सतर्क असल्याचे दिसून येत असतात. ते सतत याबद्दल भाष्य करत असताना दिसून येत असतात. नुकतंच अमेय खोपकर यांनी एक ट्विट केले आहे की. यामध्ये त्यांनी काही फोटो पोस्ट करत सरकारला झापल्याचे पाहायला मिळत आहे.
https://letsupp.com/entertainment/marathi-director-vasu-patil-stopped-at-goregaon-film-city-shar
या फोटोत गोरेगाव फिल्मसिटीकडे जाणारा रस्ता दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्यावर पाऊसामुळे सर्वत्र खड्डे पडल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी अमेय खोपकरांनी ट्विट केले आहे. तसेच अमेय खोपकरांच्या या ट्विटनंतर अनेकजण यावर प्रतिक्रिया देत असल्याचे दिसत आहेत. तसेच काहींनी यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढावा, असे सांगितले जात आहे.