Download App

Ameya Khopkar यांचा रणदीप हुड्डाला खळ्ळखट्याकचा इशारा; म्हणाले, ‘हा वाद ताबडतोब..’

Ameya Khopkar on Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच रणदीप हुड्डाला एक पत्र लिहून खळ्ळखट्याकचा इशारा दिला आहे. या पत्राच्या माध्यमातून अमेय खोपकर यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाच्या अगोदर स्वामित्वहक्कांवरुन सुरु झालेल्या वाद लवकरात लवकर थांबायला हवा, असा थेट खळ्ळखट्याकचा इशारा रणदीपला देण्यात आला आहे.

अमेय खोपकर यांनी रणदीप हुड्डाला आणि निर्माते आनंद पंडित यांना पत्र लिहून सांगितले आहे. तसेच खोपकर यांनी या पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या पत्रात अमेय खोपकर यांनी सांगितले आहे की, “हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेमधून देशात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. लंडनमध्ये थेट इंग्रजांच्या भूमीमध्ये इंग्रजांना आव्हान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी संपूर्ण जगाला अचंबित केलं होतं.

तसेच अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड त्रास देण्यात आला होता. तरी देखील शेवटपर्यंत देशासाठी ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. आपल्या या भारतमातेला ब्रिटीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची गाथा रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु प्रदर्शनाच्या अगोदर मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन चांगलाच वाद पेटत असल्याचे पाहायला मिळत आहे. जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद लवकरात लवकर थांबायला हवा, कारण यामुळे सिनेमा प्रदर्शनाला उशिरा झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान राहणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणी देखील करु नये. हा वाद लवकरात लवकर मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचे कार्य प्रत्येक घराघरात जावा, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

तसेच आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर कराल, अशी आमची अपेक्षा आहे.  रणदीप हुड्डा हा अनेक सिनेमा आणि वेब सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसापासून त्याची महाकाल ही वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला आली आहे. रणदीपच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत असते. आता रणदीपच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us