Download App

Suresh Dhas :” तुमच्या गलिच्छ राजकारणात कलाक्षेत्रातील…”; मनसेचा नेता ढाल बनून मैदानात

प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.

  • Written By: Last Updated:

MNS Leader Ameya Khopkar On Suresh Dhas : बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. धस यांच्या विधानानंतर मनसे नेते अमेय खोपकर हे कलाक्षेत्रातील अभिनेत्रींसाठी ढाल बनून मैदानात उतरले आहेत. याबाबत खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत धस यांना धारेवर धरले आहे.

खोपकर यांची पोस्ट काय? 

“सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिला आयोगाकडे करणार तक्रार

धस यांच्या विधानानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच संपूर्ण प्रकरणावर आपण पत्रका परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले असून, मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोगाकडून धस यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘त्या’ तीन आरोपींचा खून झालाय, त्यांचे मृतदेह.. मला फोन आला; दमानियांचा धक्कादायक दावा

परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे

आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना परळी राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे. परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या धंद्यांच्या जोरावर प्रचंड पैसा मिळवला जात आणि त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते.

बीड प्रकरणाचा तपास होईपर्यंत कुणीही मुंडे सत्तेत नसावा; कारवाई होणार नसेल तर गृहमंत्री जबाबदार

यासाठी सपना चौधरी (Sapna Chaudhary) , रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) , प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांना इथे आणले जाते असे धस म्हणाले. तसेच जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा.जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल असं धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात असं देखील आमदार सुरेश धस म्हणाले.

follow us