Saiyara Movie teaser Release Entertainment News : यशराज फिल्म्स (YRF) निर्मित आणि मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा (Saiyara Movie) टीझर काल प्रदर्शित झाला आहे. इंटरनेटवर टिझरला जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत (Bollywood Movie) आहे. प्रेमकथेला दिलेली आधुनिक आणि भावनिक मांडणी, आणि नवोदित जोडीचे सहज अभिनय पाहून चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट (Entertainment News) अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचं मोठं पदार्पण आहे, आणि त्यांचं स्क्रीनवरील केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली आहे.
मोहित सूरी म्हणतो की, तुम्ही कितीतरी कथा सांगू शकता, कितीतरी भावना साजऱ्या करू शकता, पण प्रेमकथा ही नेहमीच खास असते. ‘सैयारा’ ही माझ्या आयुष्यात आलेल्या, मला प्रेरणा देणाऱ्या सर्व प्रेमकथांना माझा ट्रिब्यूट आहे. मी अनेक लोकांना भेटलो आहे, ज्यांनी त्यांच्या प्रेमकथा माझ्याशी शेअर केल्या, त्यातूनच ही कथा जन्माला आली. ‘सैयारा’च्या टीझरला मिळालेला एकमुखी प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. अहान आणि अनीतसाठी मला खूप आनंद वाटतो. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, हे मोठं यश आहे. हे यश माझ्या टीमबरोबर आणि वायआरएफ सोबत शेअर करतो.
अक्षय विधानी, वायआरएफ चे सीईओ आणि चित्रपटाचे निर्माता यांनी म्हटलंय की, वायआरएफ आणि रोमांस यांचं नातं खूप जुनं आणि खास आहे. ‘सैयारा’मधून आम्ही प्रेमाच्या अशा बाजूला स्पर्श करत आहोत जी खोल आणि तरीही सकारात्मक आहे. प्रेक्षक आमच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगत होते आणि त्या पूर्ण करणं आमच्यासाठी महत्वाचं होतं. मोहित सूरीसारख्या संवेदनशील दिग्दर्शकासोबत काम करणं, ही आमच्यासाठी उत्तम संधी होती. जे प्रेम आम्ही ‘सैयारा’मधून मांडलं आहे, ते केवळ तरुणांसाठीच नव्हे, तर प्रत्येक प्रेक्षकाला भिडावं अशी आमची अपेक्षा आहे.”
“मी स्वतःहून पक्ष सोडला नाही, फडणवीसांनी मला..”, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा गौप्यस्फोट
अक्षय शेवटी म्हणतात की, ‘सैयारा’ आमच्यासाठी खास आहे. कारण या चित्रपटातून आम्ही दोन अत्यंत गुणी कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांना लॉन्च करत आहोत. ही एक अशी प्रेमकथा आहे, जी काळाच्या कसोटीवर उतरावी अशी आमची इच्छा आहे. ‘सैयारा’ 18 जुलै 2025 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे.