Download App

Adipurushच्या शोमध्ये श्रीरामांना भेटायला साक्षात आले हनुमान, Video Viral

Adipurush Released : बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा अखेर आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. (Adipurush Released) सिनेमानं रिलीज होण्याअगोदरच कोटींची कमाई केली आहे. आदिपुरूषचा फर्स्ट डे फर्स्ट शो (First day first show) संपूर्ण देशात सुरु झाला. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी सिनेमाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (Video Viral) थिएटरमध्ये सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रत्येक थिएटरमधील एक सीट भगवान हनुमानासाठी रिकामी सोडण्यात आली आहे.

आदिपुरूष बघायला गेलेल्या काही चाहत्यांनी थिएटरमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात खरचं हनुमानरूपी माकड थिएटरमध्ये आदिपुरूष बघण्यासाठी आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. हा समोर आलेला व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, आदिपुरूषच सिनेमाचा सकाळचा पहिला शो सुरू आहे.

स्क्रिनवर प्रभू श्रीरामांच्या रुपात प्रभासची एंट्री झाली आहे आणि अचानक थिएटरच्या एका खिडकीतून एक माकड डोकावून बघत आहे. तर चाहत्यांनी त्या माडकावर लाईट मारून त्याचे व्हिडीओ शुट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये आदिपुरूष बघायला स्वत: बजरंगबली आला असल्याचे हा व्हिडीओ बघणाऱ्यांनी सांगितले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

थिएटरमध्ये माकडाने एंट्री घेताच उपस्थित चाहत्यांनी जय श्रीराम जय श्रीराम हे गाणं म्हणण्यास सुरू केले आहे. गाणं ऐकत खिडकीतील माकड देखील प्रेक्षकांकडे तर कधी स्क्रीनवर दिसत असलेल्या श्रीरामांकडे बघत होते. इतकंच नाही तर हैद्राबादमधील एका थिएटरमधील तो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आदिपुरूषच्या पहिल्या शोच्या अगोदर चाहत्यांनी हनुमानासाठी ठेवलेल्या राखीव खुर्चीवर हनुमानाची प्रतिमा ठेवून त्याचं पूजन केले आहे.

अगोदर हनुमानाची पूजा आणि नंतर आदिपुरूष थिएटरमध्ये सुरू करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. प्रभासचा सिनेमा हिट होईल, कारण पहिल्या दिवशी हनुमानाने एंट्री घेऊन सिनेमाला आशिर्वाद दिल्याचे अनेकांनी सांगितले आहे. प्रेक्षकांनी सिनेमा पाहून आपल्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पौराणिक कथा रामायणावर आधारित आदिपुरूष सिनेमा चांगला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Tags

follow us