मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ( Marathi Bhasha Gaurav Din ) कवी-गीतकार गुरु ठाकूर (Guru Thakur ) यांनी सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठी भाषा ही आचरणात यावी, यासाठी मराठी भाषेचा वापर हा व्यवहारात सर्वांनी करावा, असे ते म्हणाले आहेत.
आजच्या दिवशी नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर शक्य तिथे भाषा वापरली पाहिजे. शक्य असेल तिथे मराठी भाषेतून संवाद साधला पाहिजे. तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने पोहोचेल व तिचा गौरव होईल, असे ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी लिहिलेली कविता देखील म्हणून दाखवली. “मिरवण्या पलिकडे गिरवणे थोर, संवादात धार राहो तिची, नको माऊलीची बेगडी बढाई, वर्तनात आई उमटावी”, अशा शब्दात त्यांनी मराठी भाषा ही दैनंदिन जीवनता वापरली जावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पत्र लिहित मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही, असे त्यांनी आपल्या पत्रता म्हटले आहे.
(‘आम्ही संघर्ष केला आणि पुढेही करू, पण त्यासाठी तुमची साथ हवी; राज ठाकरेंचं आवाहन)