Oscar 2026 : भारतीय चित्रपट ‘होमबाउंड’ ऑस्कर 2026 साठी शॉर्टलिस्ट
Oscar 2026 : अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या "होमबाउंड" चित्रपट 2026 च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
Oscar 2026 : अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांच्या “होमबाउंड” चित्रपट 2026 च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 9 मिनिटांच्या उभे राहून कौतुकाचा वर्षाव झालेल्या “होमबाउंड” ची ऑस्करमध्ये 15 चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये निवड करण्यात आली आहे. नीरज घायवान दिग्दर्शित आणि विशाल जेठवा आणि ईशान खट्टर (Ishaan Khatter) अभिनीत “होमबाउंड” या चित्रपटाची नुकतीच 98 व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवड झाली. तर आता ऑस्कर 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत पंधरा चित्रपटांमध्ये “होमबाउंड” ची निवड करण्यात आली आहे.
“होमबाउंड” चित्रपटाची निवड झाल्यानंतर करण जोहर भावुक
“होमबाउंड” (Homebound) चित्रपट 2026 च्या ऑस्करमध्ये 15 चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये निवड करण्यात आल्यानंतर करण जोहर भावुक झाला. धर्मा प्रॉडक्शन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर लिहिले की, 98 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये होमबाउंडला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी निवडण्यात आले आहे. जगभरातून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो.
2026 च्या ऑस्करसाठी निवडलेल्या पाच चित्रपटांची अंतिम घोषणा 22 जानेवारी 2026 रोजी केली जाईल. 2026 चा ऑस्कर 15 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये कॉमेडियन कॉनन ओ’ब्रायन पुन्हा एकदा होस्ट करणार आहेत.
#Homebound has been shortlisted for Best International Feature Film at the 98th Academy Awards! @TheAcademy
We’re deeply grateful for the extraordinary love and support we’ve received from around the world. pic.twitter.com/2dgXjh57Wx
— Neeraj Ghaywan (@ghaywan) December 16, 2025
अजितदादांचा फडणवीस – शिंदेंना धक्का; 24 तासात पिंपरी चिंचवडमध्ये फोडले 4 उमेदवार
होमबाउंड सोबतच, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीमध्ये नामांकन मिळालेल्या इतर देशांमधील चित्रपटांमध्ये अर्जेंटिनाचा “बेलेन”, ब्राझीलचा “द सीक्रेट एजंट”, फ्रान्सचा “इट वॉज जस्ट एन अॅक्सिडेंट”, जर्मनीचा “साउंड ऑफ फॉलिंग”, इराकचा “द प्रेसिडेंट केक”, जपानचा “कोकुहो”, जॉर्डनचा “ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू”, नॉर्वेचा “सेंटीमेंट व्हॅल्यू”, पॅलेस्टाईन 36 फ्रॉम पॅलेस्टाईन, दक्षिण कोरियाचा “नो अदर चॉइस”, स्पेनचा “सैराट”, स्वित्झर्लंडचा “लेट शिफ्ट”, तैवानचा “लेफ्ट-हँडेड गर्ल” आणि ट्युनिशियाचा “द व्हॉइस ऑफ हिंद रजब” यांचा समावेश आहे.
